वसईचा 'वीरू' आत्महत्या करण्यासाठी चढला छतावर!

 Palghar
वसईचा 'वीरू' आत्महत्या करण्यासाठी चढला छतावर!

शोले सिनेमातला टाकीवर चढलेला वीरू आपण सगळ्यांनी पाहिला असेलच. मात्र पालघरमध्ये देखील एकाने दारूच्या नशेत 'वीरू' स्टाईल आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. संदीप परशुराम जाधव(29) असे या व्यक्तीचे नाव असून, त्याच्या या कारनाम्याने अग्निशमन दलाचे अधिकारी तासभर जेरीला आले होते. पत्नी सोडून गेली या रागातून तो दारूच्या नशेत गळ्यात दोरी बांधून थेट इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर चढला. मात्र अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी शिताफीने त्याला वाचवण्यात यश मिळवले.

मिळालेल्या माहितीनुसार, संदीप हा वसई गावातील भस्कार अली परिसरात राहतो. बुधवारी सकाळपासूनच तो दारू पीत होता. त्यानंतर तो दारूच्या नशेत स्वत:ला गळफास लावण्याचा प्रयत्न करु लागला. अखेर भिती वाटू लागल्याने त्याने दुसऱ्या मजल्यावर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्वरित रहिवाशांनी याबाबतची माहिती पोलिसांना देताच पोलिसांनी त्याला अग्निशमन दलाच्या मदतीने खाली उतरवले.

Loading Comments