डॉ. दाभोलकरांच्या हत्येतील आरोपीचे भाऊबंद पोलिसांच्या ताब्यात

डॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी सीबीआयने नुकत्याच अटक केलेल्या सचिन अंधुरे याच्या नातेवाईकांच्या घराची सोमवारी झाडाझडती घेतली. त्यावेळी सचिनचा चुलत भाऊ आणि मेव्हण्याच्या घरातून मोठ्या प्रमाणात सीबीआयने शस्त्रसाठा जप्त केला.

याप्रकरणी पोलिसांनी सचिनचे चुलत भाऊ शुभम सुरळे, अजिंक्य सुरळे आणि मेव्हणा रोहित रेगे याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. शस्त्रसाठा अजूनपर्यंत घरात का आणि कशासाठी ठेवलं आहे? तसंच त्याचा वापर घातपाताच्या उद्देशाने करणार होते का? या अनुषंगाने पोलिस तपास करत आहेत.

तिघे सीबीआयच्या ताब्यात

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात सचिनला अटक केल्यानंतर त्याच्या चौकशीत सुरळे बंधु आणि मेव्हणा रोहित यांचं नाव पुढे आलं. पोलिस मागावर असल्याची माहिती मिळताच हे तिघेही साताऱ्यातील देवळाई रोडवरील, मंजित प्राईड या अपार्टमेंटमधील प्लॉटवर लपून बसले होते.

या प्लॉटवर निचिकेत इंगळे नावाचा तरुण मागील दोन वर्षांपासून रहात होता. या प्लॉटवर हे तिघेही लपून बसल्याचं कळाल्यानंतर मंगळवारी सकाळी तिघांना सीबीआयने ताब्यात घेतलं. त्यातील दोघांना पोलिसांनी चौकशी करून सोडलं. मात्र सुरळे बंधु आणि रोहित यांच्याकडे कसून चौकशी केली. त्यानंतर सचिनच्या सांगण्यावरून सोमवारी एटीएस आणि सीबीआयच्या पोलिस अधिकारी सुरळे बंधु आणि रोहितच्या घराची रात्री उशिरा झडती घेतली.

पोलिसांनी केलेल्या कारवाईत सुरळेच्या औरंगापूर येथील आणि सचिन अंधुरेच्या मेव्हण्याच्या घरातून पोलिसांनी 7.65 बोअरवेलची पिस्तुल, 3 जिवंत काडतुसे, तलवार आणि एका कट्यार हस्तगत केली. याप्रकरणी सिटी चौकी पोलिस ठाण्यात तिघांविरोधात शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून चौकशी सुरू असल्याची माहिती सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी दिली.


हेही वाचा - 

हिंदू संघटनांनी टाकलं दहशतवाद्यांच्या पावलांवर पाऊल

शस्त्रसाठ्यासाठी श्रीकांत पांगारकरनेच केली आर्थिक मदत!

पुढील बातमी
इतर बातम्या