दारूच्या नशेत त्याने स्वतःचा गळा चिरला

कौटुंबिक कलहातून खेरवाडीत एका ५१ वर्षीय व्यक्तीने स्वतःचाच गळा चिरून घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. महेंद्र राऊत असे या जखमीचे नाव आहे. वेळीच महेंद्रला व्हि.एन.देसाई रुग्णालयात दाखल केल्यामुळे त्याचे प्राण वाचले. राऊतवर रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून खेरवाडी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. 

हेही वाचाः- यंदाच्या अर्थसंकल्पात मध्य रेल्वेला ७६३८, पश्चिम रेल्वेला ७०४२ कोटींचा निधी

 खेरवाडीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वसाहतीतील इमारत क्रमांक ४३ मध्ये राऊत हा त्याच्या कुटुंबियांसोबत राहतो. मागील अनेक दिवसांपासून कौटुंबिक वादातून तो मानसिक तणावात होता. दरम्यान बुधवारी रात्री त्याने मद्यपान केल्यानंतर तो खिशात चाकून घेऊन इमारतीच्या टॅरेसवर गेला. तो आत्महत्या करणार असल्याचे जमावाने पाहिल्यानंतर नागरिकांनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर खेरवाडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. 

 हेही वाचाः- कोस्टल रोड संकल्पचित्राला मुंबईकरांची पसंती!

इमारतीच्या टॅरेसवर जाऊन त्याची समजूत काढली जात असताना. अचानक त्याने स्वतःजवळील चाकूने गळ्यावर वार करून घेतला. नागरिकांनी त्याला तातडीने जवळील व्हि.एन.देसाई रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्याच्या जिवाला कुठलाही धोका नसून त्याची प्रकृती लवकरच सुधारेल, असं डॉक्टरांनी सांगितलं. 

 

 

पुढील बातमी
इतर बातम्या