केंद्रीय
अर्थमंत्री निर्मला सीतारमण
यांनी अर्थिक वर्ष २०२०-२१
चा अर्थसंकल्प सादर केला.
या
अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांसह
अनेक प्रकल्पांना चालना
देण्यासाठी रुपयांची तरतूद
केली आहे.
त्याचप्रमाणं
रेल्वे प्रकल्पांसाठीही कोटी
रुपयांची तरतूद केली आहे.
विशेष
म्हणजे या अर्थसंकल्पात मुंबई
उपनगरीय विभागासाठी असलेल्या
एमयूटीपीच्या प्रकल्पांना
चालना देण्यासाठी ५५०
कोटी
रुपयांच्या निधीची तरतूद
करण्यात आली आहे.
राज्यभरातील
मध्य रेल्वेच्या विविध
प्रकल्पांसाठी केंद्रीय
अर्थासंकल्पात ७६३८ कोटी
रुपये देण्यात आले आहेत.
मुंबईला
उत्तर भारताशी जोडणाऱ्या
पश्चिम रेल्वेला ७०४२ कोटींचा
निधी देण्यात आला आहे.
अर्थसंकल्पात
मुंबई उपनगरीय विभागासाठी
५५० कोटी रुपयांची तरतूद
केल्यानं गेल्या अनेक वर्षांपासून
रखडलेल्या प्रकल्पांना चालना
मिळणार आहे.
अर्थसंकल्पात
रेल्वेच्या विकासासाठी ७०
हजार
कोंटीची तरतूद करण्यात आली
आहे.
त्यापैकी
काही हजार कोटी मुंबई उपनगरीय
रेल्वे,
पश्चिम
रेल्वे आणि मध्य रेल्वेला
देण्यात आला आहे.
एमआरव्हीसी
राबवत असलेल्या एमयूटीपी-२
साठी
२००
कोटी
,
एमयूटीपी-३
करता
३००
कोटी
तर एमयूटीपी-३ए
मधील
प्रकल्पांसाठी ५०
कोटी
रुपयांची तरतूद करण्यात आलेली
आहे.
उपनगरीय रेल्वे मार्गावरील रेल्वे स्थानकांवरील एकात्मिक सुरक्षा यंत्रणा, तिकीट यंत्रणा, पादचारी पूल, रेल्वे ट्रॅकची देखभाल आणि दुरुस्ती, प्रवासी सुविधांमध्ये सरकते जिने-लिफ्ट उभारण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.
एटीव्हीएम,
लिफ्ट,
एक्सलेटरची
संख्या वाढविण्यावर भर देण्यात
आला आहे.
तसंच,
चर्चगेट-विरार
ट्रॅक दुरुस्ती तसंच,
लोअर
परेल वर्कशॉपमध्ये एलएचबी
कोचचं उत्पादन वाढविण्यावर
भर देण्यासाठी निधीची तरतूद
करण्यात आली आहे.
एमयूटीपी
२
-
२००
कोटी
एमयूटीपी
३
-
३००
कोटी
एमयूटीपी
३
ए
-
५०
कोटी
सीवूड्स-बेलापूर-उरणसाठी १०० कोटी
मध्य रेल्वेसाठी ७ हजार ६३८ कोटींचा निधी तरतूद
पश्चिम रेल्वेसाठी
७
हजार
०४२
कोटींचा
निधी तरतूद
हेही वाचा -
टायगर श्रॉफच्या 'बागी ३'चा ट्रेलर प्रदर्शित, अॅक्शनचा ट्रिपल धमाका
कोस्टल रोड संकल्पचित्राला मुंबईकरांची पसंती!