Advertisement

टायगर श्रॉफच्या 'बागी ३'चा ट्रेलर प्रदर्शित, अॅक्शनचा ट्रिपल धमाका

चित्रपटात अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) यांच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. पहिल्यांदाच चित्रपटामध्ये जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) टायगर श्रॉफच्या वडिलांची भूमिका साकारणार आहे.

टायगर श्रॉफच्या 'बागी ३'चा ट्रेलर प्रदर्शित, अॅक्शनचा ट्रिपल धमाका
SHARES

बागी ३’ (Baaghi 3) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच याचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) यांच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तसंच या भागामध्ये अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) देखील दिसणार आहे. यासोबतच अंकिता लोखंडे देखील झळकणार आहे. चित्रपटात पहिल्यांदाच जॅकी श्रॉफ  (Jackie Shroff) टायगर श्रॉफच्या वडिलांची भूमिका साकारणार आहे.  

बागी ३’मध्ये अभिनेता रितेश देशमुख (विक्रम) आणि टायगर श्रॉफ (रोनी) हे दोघे भाऊ आहेत. काही कारणास्तव विक्रमला सीरियाला जावं लागतं. तिकडे अबू जलाल विक्रमचे अपहरण करतो. त्याला सोडवण्यासाठी टायगर श्रॉफ सर्व सीमा ओलांडतो. या सर्वात रोनीला श्रद्धा कपूरची साथ मिळते.

बागी’ हा चित्रपट २०१६ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात श्रद्धा कपूर आणि टायगर मुख्य भूमिकेत होते. तसंच चित्रपटाचं दिग्दर्शन सब्बीर खाननं केलं होतं. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. त्यानंतर मार्च २०१८ मध्ये बागी २ प्रदर्शित झाला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर २५३ कोटींची कमाई केली होती. या भागात दिशा पटाणी आणि टायगर मुख्य भूमिकेत होते. प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद या चित्रपटाला लाभला. ‘बागी ३’ हा चित्रपट ६ मार्च २०२० ला प्रदर्शित होणार आहे.

टायगर श्रॉफ शेवटचा वॉर या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत ऋतिक रोशन देखील होता. दोघांची धमाकेदार अॅक्शन चित्रपटात पाहायला मिळाली होती. त्यामुळे या जोडिला प्रेक्षकांनी पसंती दिली होती. वॉर २ चित्रपट येणार अशी चर्चा देखील होती. तर श्रद्धा कपूर शेवटची स्ट्रीट डान्सर चित्रपटात दिसली होती. तिच्यासोबत वरुण धवन झळकला होता.हेही वाचा

सनी देओलचे या वेबसीरिजमधून डिजीटल क्षेत्रात पदार्पण

विकी कौशलच्या 'भूत'चा ट्रेलर प्रदर्शित

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा