Advertisement

कोस्टल रोड संकल्पचित्राला मुंबईकरांची पसंती!

कोस्टल रोड कसा असेल, काय वैशिष्ट्य आहेत?

कोस्टल रोड संकल्पचित्राला मुंबईकरांची पसंती!
SHARES

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा महत्वकांशी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोस्टल रोडचे संकल्पचित्र मुंबईकरांच्या पसंती पडत आहे. नुकतेच मुंबई कोस्टल रोड प्रोजेक्टकडून या संकल्पचित्राचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर टाकण्यात आला आहे. आतापर्यंत ट्विटरवर या व्हिडिओला १.८के लाइक्स मिळाले आहेत. तर २६२ जणांनी हा व्हिडिओ रिट्विट केला आहे. 

 


मुंबई महानगर पालिकेचा ड्रिम प्रोजेक्ट असलेला प्रस्तावित कोस्टल रोड २९.२० किमी लांबीचा असून हा कोस्टल रोड,मरिन लाईन्सवरील प्रिन्सेस स्टि्टपासून कांदिवलीपर्यंत असणार आहे. या प्रोजेक्टचे बजेट तब्बल १५ हजार कोटी रूपयांचे आहे. प्रिन्सेस स्ट्रीट ते बांद्रा वरळी सी लिंक या पहिल्या टप्प्यासाठी ५ हजार ३०० कोटी रूपये खर्च केले जाणार आहेत. तर  बांद्रा वरळी सी लिंक ते कांदिवली या दुस-या टप्प्यासाठी ९ हजार ७९० कोटी रूपये खर्च येणार आहे. २९.२० किमी अंतरामध्ये दोन बोगदेही बांधले जाणार असून त्यांची लांबी ६ किलोमीटर असणार आहे. कोस्टल रोड शहरातील अंतर्गत रस्त्यांशी जोडण्यासाठी ११ ठिकाणी इंटरचेंजेस ठेवले जाणार आहेत.

कोस्टल रोड बनविण्यासाठी १६८ हेक्टरवर भराव टाकला जाणार असून यापैकी ९८ हेक्टर क्षेत्र हे हरित क्षेत्राखालील आहे. कोस्टल रोडवर दोन्ही बाजूला सार्वजनिक वाहतूक म्हणजे बेस्ट बसेससाठी वेगळी मार्गिका ठेवली जाणाराय. ऑक्टोबर २०१७ पासून ख-या अर्थाने कोस्टल रोडच्या कामाला सुरूवात होणार आहे.कोस्टल रोडमुळं प्रवासाच्या वेळेत ७० टक्क्यांची बचत होणार आहे. तर ३४ टक्के इंधन वाचणार आहे.


कोस्टल रोड कसा असेल, काय वैशिष्ट्य आहेत?

  • साडे सहा किलोमीटरचे बोगदे

  • आठ लेनचा मार्ग, मार्गावर ४ इंटरचेंज

  • सिग्नल फ्री मार्ग

  • ३४ % इंधन बचत होणार

  • १६५० वाहन पार्किंगची सोय

  • ४ दशलक्ष मेट्रिक टनच मटेरियल वापरणार

  • माल आणण्यासाठी दोन जेट्टी उभारणार

  • ४ वर्षाचा कालावधी

  • ९० हेक्टर ओपन जागा, २६ हजार कोटींची जागा उपलब्ध होणार

  • पुरामध्ये देखील हा मार्ग वापरता येणार

 

 

 

 

 

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा