सुशांत सिंह राजपूत आत्महत्येचा तपास करण्यासाठी मुंबईत आलेल्या बिहार पोलिस दलातील अधिक्षक विनय तिवारी यांना क्वारंटाईन केल्यानंतर बिहार पोलिस महासंचालक चांगलेच संतापले. तिवारी यांना सोडण्यासाठी बिहारचे आयजी यांनी पालिकेला पत्र व्यवहार केला. मात्र पालिकेने त्यालाही केराची टोपली दाखवल्याचा आरोप करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयानेही पालिकेच्या आडमुठेपणावर प्रश्न उपस्थित केल्यानंतरही अधिकाऱ्याला न सोडल्याने बिहारचे पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी ट्विटरवर नाराजी व्यक्त केली आहे.
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासासाठी आलेल्या बिहार पोलिसांना पहिल्या दिवसांपासून त्यांना अनेक परिस्थितींचा सामना करावा लागत होता. सुशांत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी बिहारहून एसपी विनय तिवारी हे रविवारी मुंबईत आले. या प्रकरणाच्या तपासात ते लक्ष घालणार तोच कोरोना संक्रमण काळातील नियमानुसार, त्यांच्या हातावर १५ दिवसांचा क्वारंटाईन शिक्का मारत, त्यांना १५ आॅगस्टपर्यंत क्वारंटाईन राहण्यास सांगितलं आहे. तिवारी यांच्यानंतर आता तपासासाठी आलेल्या ४ अधिकाऱ्यांनाही क्वारंटाईन केलं गेलं आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणी रिया चक्रवर्तीने सर्वोच्च न्यायालयात सुशांत आत्महत्येचा तपास मुंबई पोलिसांकडेच ठेवण्याबाबत याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावनी दरम्यान न्यायालयाने मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्न उपस्थित करत कान उपटले. तसेच पालिकेने तपास अधिकाऱ्यांना केलेल्या क्वारंटाईनवरही नाराजी व्यक्त केली. त्यावेळी न्यायालयात केंद्र सरकारतर्फे हा गुन्हा पुढील तपासासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी लिहिलेल्यापत्रानुसार सीबीआयकडे वर्ग करण्यात येणार असल्याचं सांगितलं.
अधिकाऱ्यांना केलेल्या क्वारंटाईनबाबत पालिकेने खुलासा केला होता. बिहार येथून आलेल्या या अधिकाऱ्यांना देशांतर्गत प्रवास करणार्या व्यक्तिंसाठी लागू असलेली गृह अलगीकरण (होम क्वारंटाईन) बाबतची संपूर्ण प्रक्रिया पालिका अधिकाऱ्यांनी दिली. राज्य शासनाचे दिनांक २५ मे २०२० रोजीचे आदेश क्रमांक डिएमयू/२०२०/सीआर ९२/डिएसएम १ अन्वये देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्या व्यक्तिंसाठी नियमावली ठरवून देण्यात आली असून त्यामध्ये गृह अलगीकरणाचा देखील समावेश आहे, त्याची सविस्तर माहिती त्यांना देण्यात आली. त्यासोबतच, पालिकेने राज्य शासनाच्या नियमावलीनुसार, गृह अलगीकरणातून सूट मिळण्यासाठी त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सक्षम प्राधिकारी यांच्याकडे नियमावलीनुसार अर्ज केल्यास अधिकाऱ्यांना सोडण्यात येईल असे म्हटले होते. मात्र पत्र पाठवून ही अधिकाऱ्यांना न सोडल्यामुळे बिहारचे पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे ट्विरहून नाराजी व्यक्त केली.
हेही वाचा -
Mumbai Rains : लँडस्लाईडमुळे पेडर रोड वाहतुकीसाठी बंद
निसर्गाचं रौद्ररुप! पावसाने २४ तासात मुंबईचं ‘इतकं’ केलं नुकसान