लैंगिक अत्याचाराला आळा घालण्यासाठी पोलिसांचा स्तुत्य उपक्रम, ६३ सराईत आरोपींची यादी तयार

मुंबई सारख्या शहरांमध्ये लैगिक अत्याचाराच्या वाढत्या घटना ही पोलिसांची डोकेदुखी ठरत आहेत. या घटना रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी आता कंबर कसली असून लैगिक अत्याचारातील ६३ सराईत आरोपींची यादीच पोलिसांनी तयार केली आहे. तर नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी पोलिसांनी झोपडपट्टी परिसरात बैठका घेण्यास सुरूवात केली आहे.

हेही वाचाः-केंद्र सरकारची मोठी घोषणा! ‘या’ ठिकाणी लॉकडाऊन सक्तीचा

लॉकडाऊनच्या काळात लैंगिक अत्याचाराच्या घटनां घडूनही अनेक महिला पुढे येऊ शकल्या नाही, ही शक्यता लक्षात घेऊन आता उत्तर मुंबबईतील पोलिसांनी स्वतः झोपडपट्टी व गावठाण परिसरात जाऊन त्यांच्या बैठका घेण्यास सुरूवात केली आहे. आतापर्यंत उत्तर मुंबईतील ८२ ठिकाणी अशा बैठका घेण्यात आल्या आहेत. आठवड्याभरात उत्तर मुंबईतील १५२ झोपडपट्टी परिसरात अशा बैठका घेण्यात येणार आहे. लैंगिक अत्याचाराच्या प्रसंगाला सामोरे गेल्यानंतरही लॉकडाऊनमुळे काही महिला त्याची तक्रार करू शकल्या नाहीत. ही शक्यता लक्षात घेऊन आता पोलिसांनी स्वतः झोपडपट्टी परिसरातील महिलांची बैठक घेण्यास सुरूवात केली आहे. त्या अंतर्गत अल्पवयीन मुले व मुलींनाही गुड टच व बॅड टचचे धडे देण्यात आले. उत्तर मुंबईतील पोलिसांनी हा स्तुत्य उपक्रम या आठवड्यापासन सुरू केला आहे.

हेही वाचाः-मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारची भूमिका संशयास्पद- चंद्रकांत पाटील

शाळा सुरू असताना मुंबई पोलिस पोलिस दीदी या कार्यक्रमा अंतर्गत विद्यार्थांना मार्गदर्शन करायचे. पण सध्या लॉकडाऊनमुळे शाळा बंद असल्यामुळे मुलांपर्यंत पोहोचण्याचा हा देखील एक मार्ग पोलिसांनी निवडला आहे. याशिवाय सध्या मुले घरातच असल्यामुळे परिचीत व्यक्तींकडन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे पोलिसांनी स्वतः पुढाकार घेऊन अशा बैठकांच्या मार्फत लोकजागृती करण्यास सुरूवात केली आहे. उत्तर परिमंडळातील पोलिसांनी त्यांच्या परिसरातील १५२ झोपडपट्टी व गावठाणापैकी ८२ ठिकाणी आठवड्याभरात बैठका घेऊन महिलांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच लैंगिक अत्याचाराच्या करणा-या व्यक्तीला न घाबरता पोलिसांना त्याची तक्रार करण्याचे आवाहन त्यांना करण्यात आले आहे.

हेही वाचाः-TRP Scam: पाच गुंतवणूकदारांची होणार चौकशी

या उपक्रमा अंतर्गत स्थानिक प्रतिनिधी, नगरसेवक यांची मदत घेण्यात येत आहे. या बैठकांच्या माध्यमां अंतर्गत अनेक महिलांनी त्यांच्या अडचणी पोलिसांना सांगितल्या आहेत. त्या अनुषंगाने गेल्या १० वर्षातील सराईत लैंगिक अत्याचारातील आरोपींची यादी बनवण्यात आली आहे. त्यात ६३ व्यक्तींचा समावेश असून येणा-या काळात त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येईल, असी माहिती एका अधिका-यांनी दिली.

पुढील बातमी
इतर बातम्या