TRP Scam: पाच गुंतवणूकदारांची होणार चौकशी

रिपब्लिक वहिनीच्या आर्थिक व्यवहारांमध्ये अनियमितता आढळल्याने गुंतवणूकदारांकडे चौकशी केली जाणार आहे.

TRP Scam: पाच गुंतवणूकदारांची होणार चौकशी
SHARES

पैसे देऊन टीआरपी वाढविण्याच्या घोटाळ्यात गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने रिपब्लिक चॅनेल भोवती फास आवळण्यास सुरूवात केली आहे. पोलिसांनी या चॅनेलमध्ये गुंतवणूक करणाऱ्या सात गुंतवणूकदारांना समन्स बजावून चौकशीला हजर राहण्यास सांगितले आहे. या चौकशीतून चॅनेलला होणाऱ्या आर्थिक उत्पन्नाचे स्रोतही तपासण्यात येणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचाः- कोरोना चाचणी आता आणखी स्वस्त, 'हे' आहेत नवीन दर

बहुचर्चित टीआरपी घोटाळ्यात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहे. या प्रकरणात नुकतीच पोलिसांनी दहाव्या आरोपीला अटक केली. या प्रकरणात सहभाग आढळलेल्या वाहिन्यांच्या आर्थिक व्यवहारांचे गुन्हे शाखेने फॉरेन्सिक ऑडिट सुरू केले आहे. आरपीजी पावर ट्रेडिंग, अनंत उद्योग एलएलपी, पूर्वांचल लिझिंग, पॅन कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आणि डायनामिक स्टोरेज अँड रिट्रीव्हल सीस्टीम या कंपन्या रिपब्लिक वाहिनीत गुंतवणूकदार आहेत. आरपीजी कंपनीने १०; तर अनंत उद्योग एलएलपीने ७.५ कोटींची गुंतवणूक रिपब्लिक वाहिनीत केली आहे. रिपब्लिक वहिनीच्या आर्थिक व्यवहारांमध्ये अनियमितता आढळल्याने गुंतवणूकदारांकडे चौकशी केली जाणार आहे.

हेही वाचाः-महिला प्रवाशांसाठी 'इतक्या' लोकल पश्चिम रेल्वेवर धावणार?

टीआरपी घोटाळ्यामध्ये हंसा रिसर्च ग्रुप ही कंपनी तक्रारदार आहे. हंसा आणि रिपब्लिक वाहिनीमधील आर्थिक व्यवहारही उघड झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. टीआरपी मोजण्यासाठी बार्कने ग्राहकांच्या घरी बसविलेल्या बॅरोमिटर यंत्रांची डागडुजी, देखभालीसाठी हंसा कंपनीची नियुक्ती करण्यात आली. मात्र, रिपब्लिकसोबतच्या आर्थिक व्यवहारांबाबत हंसा कंपनीने बार्कला काहीच कळविले नसल्याचेही समोर आले आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा