Advertisement

महिला प्रवाशांसाठी 'इतक्या' लोकल पश्चिम रेल्वेवर धावणार?

सध्या ६ लोकल धावत असून, यामध्ये आणखी ४ महिला विशेष लोकल फेऱ्यांची भर पडणार आहे.

महिला प्रवाशांसाठी 'इतक्या' लोकल पश्चिम रेल्वेवर धावणार?
SHARES

राज्य सरकारनं (state government) मागील बुधवारपासून सर्वसामान्य महिलांना लोकल प्रवासाची (women railway passengers) परवानगी दिली. मागील अनेक महिन्यांनतर लोकल सुरू केल्यानं महिलांमध्ये उत्साहचं वातावरण आहे. परंतु, परवानगीनंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकात गर्दी चाळण्यासाठी महिला विशेष लोकल फेऱ्यांची संख्या वाढवण्याच्या दृष्टीनं पश्चिम रेल्वेनं (western railway) नियोजन सुरू केल्याची माहिती समोर येत आहे. सध्या ६ लोकल धावत असून, यामध्ये आणखी ४ महिला विशेष लोकल फेऱ्यांची भर पडणार आहे.

लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना लोकल (mumbai local) प्रवासची मुभा देण्यात आली होती. त्यामुळं लोकलनं प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांसाठी महिला प्रवाशांकरिता काही महिन्यांपूर्वी २ लोकल पश्चिम रेल्वेनं सुरू केल्या. त्यानंतर सर्वच महिलांना लोकल प्रवासाची परवानगी मिळाल्यानं २१ ऑक्टोबरपासून आणखी ४ लोकलची भर पडली.

या लोकल चर्चगेट ते विरार ते चर्चगेट स्थानकादरम्यान धावत आहेत. अत्यावश्यक सेवा कर्मचारी महिला सोडता अन्य महिलांना लोकल प्रवासाची परवानगी सकाळी ११ ते दुपारी ३ आणि संध्याकाळी ७ वाजल्यानंतर आहे. या वेळेतही प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या (women passenger) लक्षणीय आहे. २० ऑक्टोबरला ३ लाख ५३ हजार ५५७ असलेली प्रवासी संख्या २५ ऑक्टोबरला ३ लाख ८० हजार झाली. यात महिला प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे.

लॉकडाऊनपूर्वी महिलांसाठी १० लोकल फेऱ्या होत्या. आता ही ६ सहा आहे. आणखी ४ महिला विशेष लोकल फेऱ्या सुरू करण्याचं नियोजन पश्चिम रेल्वेकडून आखलं जात आहे. चर्चगेट ते विरार ते चर्चगेटबरोबरच डहाणूचाही विचार होत आहे. गर्दीच्या वेळेबरोबर कमी गर्दीच्या वेळेतही या फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांची संख्या वाढते आहे.

तिकीट खिडक्यांवर होणाऱ्या गर्दीचा अंदाज घेऊन सकाळी अर्धा ते पाऊण तास आधीच रांगा लावल्या जात आहेत. तिकीट खिडक्यांची संख्या कमी असल्यानं रांगेत तासन्तास जातात. याचा महिला प्रवाशांना मनस्ताप होतो. पश्चिम रेल्वे उपनगरीय स्थानकात लॉकडाऊनपूर्वी २९२ तिकीट खिडक्या सुरू होत्या. १८ ऑक्टोबरला तिकीट खिडक्यांची संख्या १३३ होती. २४ ऑक्टोबरला हीच संख्या २७० पर्यंत पोहोचली आहे. आणखी तिकीट खिडक्या येत्या आठवड्याभरात सुरू केल्या जाणार आहेत.



हेही वाचा -

कोरोना चाचणी आता आणखी स्वस्त, 'हे' आहेत नवीन दर

महिला प्रवाशांसाठी 'इतक्या' लोकल पश्चिम रेल्वेवर धावणार?


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा