आरटीओ विभागात खोटे कागदपत्र सादर करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

परिवहन विभागाने आता रिक्षा परमिट मिळवण्यासाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे सादर करण्याची सक्ती केली आहे. पण वास्तव्याचा खोटा दाखला सादर केल्याप्रकरणी अर्जदारासह एका दलालाविरोधात एमएचबी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोरिवली आरटीओ कार्यालयाच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोघांविरोधात गुन्हा दाखल

परमिटसाठी खोटी कागदपत्रे सादर करणारे ओमप्रकाश यादव आणि दलाल प्रेमनाथ दुबे या दोघांविरोधात एमएचबी पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली केली. पोलिसांनी त्यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. परमिटसाठी सादर केलेल्या कागदपत्रांत वास्तव्याचा पुरावा खोटा असल्याचे लक्षात येताच ही कारवाई करण्यात आली.

परमिट मिळण्याच्या आशेने अर्ज सादर करताना अर्जदार ओमप्रकाश यादव याने आवश्यक असणारा स्थानिक वास्तव्याचा दाखला अर्जासोबत सादर केला होता. हा दाखला संशयास्पद असल्याचे सहाय्यक निरीक्षक विश्वंभर कोकाटे यांच्या लक्षात आले. त्याबाबतचा अहवाल सहाय्यक आरटीओ कृष्णदेव जाधव यांच्याकडे पाठवण्यात आल्यानंतर त्यांनी त्यात लक्ष घताले. त्यानंतर त्यांनी या पुराव्याची पडताळणी करण्यासाठी कागदपत्रे बोरिवली तहसीलदार कार्यालयात पाठवला. त्यांच्या पडताळणीत हा दाखला बोरिवली तहसीलदार कार्यालयाकडून देण्यात आला नसल्याचे उघड झाल्यानंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.


हेही वाचा -

लाच घेताना अंधेरी आरटीओच्या लिपिकाला अटक


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

पुढील बातमी
इतर बातम्या