Advertisement

रिक्षा-टॅक्सीचे नवीन परवाने नाहीच


रिक्षा-टॅक्सीचे नवीन परवाने नाहीच
SHARES

मुंबईत वाहतूककोंडीच्या समस्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. ही बाब लक्षात घेत राज्य मोटर वाहन विभागाने रिक्षा आणि टॅक्सीचे नवीन परवाने न देण्याचे अधिकृत निवेदन जारी केले आहे. रिक्षा टॅक्सीचे रद्द करण्यात आलेले परवाने पुन्हा सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली असली तरी नवीन रिक्षा-टॅक्सीचे परवाने देण्यावर मात्र बंदी कायम ठेवली असल्याचे देखील या निवेदनात म्हटले आहे.

महाराष्ट्रात सध्या 7.5 लाख रिक्षा आणि 79 हजार काळी-पिवळी टॅक्सी रसत्यांवर धावतात. तर 1 लाख 39 हजार रिक्षा आणि 55 हजार टॅक्सी मुंबईच्या रस्त्यांवर धावतात. मागील दोन दशकात शहरातल्या लोकसंख्येत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे शासनाने आणखी एक लाख परवाने मंजूर करावेत अशी मागणी रिक्षा- टॅक्सी संघटनांनी केली होती. मात्र राज्य सरकारने 1997 पासून रिक्षा टॅक्सीच्या परवान्यांची संख्या वाढवलेली नाही.

ज्या शहरांची लोकसंख्या पाच लाखांहून अधिक आहे, त्या ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या गंभीर असून ती सोडवण्यासाठी केंद्र सरकारने निर्देश जारी केले आहेत. त्या निर्देशांनुसारच राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा