आता आरटीओ देखील कॅशलेस होणार

  Mumbai
  आता आरटीओ देखील कॅशलेस होणार
  मुंबई  -  

  शहरातील प्रादेशिक परिवहन कार्यालायात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार चालतात. त्याला आळा बसण्यासाठी मुंबई प्रादेशिक कार्यलयाने एक नवी शक्कल लढवली आहे. वाहन परवाना काढणे, शिकाऊ तसेच पक्के परवाने, पत्ता-नाव बदलणे, परवाने रिन्यू करणे या कामांसाठी आता 4.0 प्रणाली सुरू केली आहे. या ऑनलाईन प्रणालीमध्ये शुल्क भरण्याची सोय ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

  ऑनलाईन शुल्क भरा असे आवाहन प्रादेशिक कार्यालयाने नागरिकांना केली आहे. सध्या सर्वत्र ऑनलाईन प्रक्रिया चालू करण्यात आली. मग ते सरकारी असो अथवा खासगी संस्था त्यामुळेच आता आरटीओ देखील कॅशलेस होणार आहे. त्यासाठी एक नवी प्रणाली विकसीत करण्यात आली आहे. आता आरटीओमधील कामांसाठी आपल्याला रांगा लावण्याची गरज नाही तसेच दलालापासून देखील आपली सुटका होणार आहे. सर्व अर्ज आता ऑनलाईन मिळणार आहे. त्यानुसार वाहन परवानापासून अनेक कामे ऑनलाईन करण्याचा निर्णय परिवहन कार्यालयाने घेतला आहे. यासर्व प्रक्रियेमुळे आता नागरिकांचा पैसा आणि वेळ वाचणार आहे. या शिवाय आरटीओमधील गैरप्रकाराला देखील आळा बसणार आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.