लाच घेताना अंधेरी आरटीओच्या लिपिकाला अटक


लाच घेताना अंधेरी आरटीओच्या लिपिकाला अटक
SHARES

अंधेरीच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या(आरटीओ) वरिष्ठ लिपिकासह एजंटला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहात अटक केली आहे. राजेश लोखंडे (39) असे या वरिष्ठ लिपिकाचे नाव असून, त्याच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नावाखाली लाच स्वीकारणारा एजंट पोपट आव्हाड (44) याला देखील एसीबीने 10 हजार रुपयांची लाच घेताना अटक केली आहे.

या प्रकरणातील तक्रारदाराचे नातेवाईक हे रिक्षा परमिटच्या लॉटरीमध्ये विजेते ठरले होते. मात्र जेव्हा ते परमिट घेण्यासाठी अंधेरी आरटीओ कार्यालयात जाऊन वरिष्ठ लिपिक असलेल्या राजेश लोकांडे यांना भेटले तेव्हा त्यांनी प्रत्येक फाईल करिता 3000 आणि साहेबांकरिता 5000 रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती एका फाईलमागे 2000 असे दोन फाईलमागे 4000 आणि साहेबांना द्यायला 6000 रूपये द्यायचे ठरले. साहबांसाठीचे 6000 रुपये पोपट आव्हाड नावाचा एजंट स्वीकारणार होता.

दरम्यान, तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केली असता मंगळवारी एसीबीने सापळा रचून वरिष्ठ लिपिकासह एजंटला लाच घेताना अटक केली. आता हा पोपट आव्हाड नावाचा एजंट नेमका कोणत्या साहेबांसाठी लाच घेत होता त्याचा शोध एसीबीचे अधिकारी घेत आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा