रायननंतर आता 'या' शाळेतल्या विद्यार्थिनीला मारहाण

रायन इंटरनॅशनल शाळेतल्या घटनेनंतर आता देशभरातील शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

गोरगावमधील माऊंट मेरी शाळेतल्या विद्यार्थिनीला मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. शाळेतल्या शिक्षकांनीच मारहाण केल्याचा आरोप होत आहे. याप्रकरणी शिक्षकांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ती मुलगी माऊंट मेरी शाळेत नववीच्या वर्गात शिकत आहे. शिक्षकांनी विनाकारण मारहण आणि त्रास दिल्या प्रकरणी गोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी त्या मुलीने होमवर्क केला नाही म्हणून शिक्षकांनी तिच्या कानावरच मारले होते. त्यानंतर तिचे कान दुखू लागले. त्यामुळे तिच्या पालकांनी तिला सिद्धार्थ रुग्णालयात तपासणीसाठी नेले. तेव्हा तिच्या कानाला मार लागल्यानेच तिचे कान दुखत असल्याचे तिथल्या डॉक्टरांनी सांगितले.

ज्यानंतर त्या मुलीने शाळेत घडलेली बाब सांगितल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी शाळा प्रशासनाविरोधात पोलिसांत गुन्हा नोंदवला. त्यानंतर पोलिसांनी शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांना बोलावून कारवाई सुरू केली आहे.

या घटनेनंतर पालकांनी मुलीला माऊंट मेरी शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेत शाळा सोडल्याचा दाखला देण्याची मागणी त्या शाळेकडे केली. पण माऊंट मेरी शाळा काही दाखला देण्यास तयार नाही.


हेही वाचा - 

कांदिवलीतील रायन स्कूलमुळं 'यांच्या' मुलाचं वर्ष वाया

चांदिवलीतील शाळेत खेळताना एका विद्यार्थ्याचा मृत्यू


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

पुढील बातमी
इतर बातम्या