चांदिवलीतील शाळेत खेळताना एका विद्यार्थ्याचा मृत्यू


चांदिवलीतील शाळेत खेळताना एका विद्यार्थ्याचा मृत्यू
SHARES

साकीनाका येथील पवार पब्लिक शाळेत ६ वर्षीय मुलाचा अकस्मात मृत्यू हा त्याच्या घशात काही अडकून झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. मुलाच्या शवविच्छेदन अहवालात मुलाला न्यूमोनिया झाल्याची लक्षणे दिसत असून त्याची फुफ्फुसही अशक्त झाल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. डॉक्टरांनी प्राथमिक रिपोर्ट दिला असून रासायनिक चाचण्यांसाठी व्हिसेरा राखून ठेवला आहे. केमिकल अॅनालिसीसच्या रिपोर्टनंतरच स्वरंगच्या मृत्यूचे निश्चित कारण समजू शकेल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

गुरुवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास चांदिवली येथील पवार पब्लिक स्कूलमध्ये पहिलीच्या वर्गात शिकत असलेल्या स्वरंगचा खेळताना तो अचानक बेशुद्ध होऊन खाली कोसळला. त्यानंतर स्वरंगला त्वरीत डॉक्टरांकडे नेले असता त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्याचे वडील रत्नदीप दळवी हे भांडुपमधील पवार पब्लिक स्कूलमध्ये म्युझिक टिचर आहेत.

याप्रकरणाची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी हिरानंदानी रुग्णालयाला भेट दिल्यानंतर शाळेतील सर्व कर्मचारी आणि सीसीटीव्ही यांचा देखील तपास केला. 

सकाळी 9.40 मिनिटाला मधला ब्रेक असताना स्वरंग हा दुसऱ्या मजल्यावरील त्याच्या वर्गाजवळच खेळत होता. त्याचवेळी तो जागेवरच खाली कोसळला. त्यानंतर आमच्या शाळेतील डॉक्टरांना बोलावून त्याची तपासणी केली असता तो डोळे उघडत नव्हता. त्यामुळे आम्ही स्वरंगला हिरानंदानी रुग्णालयात नेले असता तिथल्या डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनीही सीसीटीव्हीची तपासणी केली आहे.

- मुख्यध्यापिका, डॉ. माधवी फडके


सकाळी 9.55 मिनिटाच्या सुमारास मुलगा खेळत होता, तो दुसऱ्या मजल्यावरील त्याच्या वर्गाजवळ पॅसेजमध्ये खेळत होता आणि जागेवर उभा असतानाच तो खाली पडला. त्याच्या अंगावर कोणतीही जखम आढळून आलेली नाही. शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे नेमके कारण समजू शकेल.
- संजय पाटील, सहाय्यक आयुक्त


हेही वाचा - 

कांदिवलीतील रायन स्कूलमुळं 'यांच्या' मुलाचं वर्ष वाया

पालकांनो! तुमच्या पाल्याच्या सुरक्षिततेसाठी हे कराच!


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा