Advertisement

कांदिवलीतील रायन स्कूलमुळं 'यांच्या' मुलाचं वर्ष वाया


कांदिवलीतील रायन स्कूलमुळं 'यांच्या' मुलाचं वर्ष वाया
SHARES

हरियाणातल्या गुरुग्राममधील रायन शाळेत प्रद्युमन नावाच्या विद्यार्थ्याची हत्या झाली होती. त्यानंतर आता मुंबईतल्या कांदिवलीतील रायन शाळेतील अनेक प्रकार उघडकीस येत आहेत. 

या शाळेतील आणखी एक प्रकार उघडकीस आणला आहे तो रिक्षाचालक गणपती झा यांनी. खरंतर गणपती यांची दोन्ही मुलं कांदिवलीतल्या रायन इंटरनॅशनल शाळेत शिकतात. 

गणपती झा यांच्या म्हणण्याप्रमाणं, पैशांची अडचण असल्यानं मुलांची फी त्यांना वेळेवर भरता आली नाही. फी वेळेवर न भरल्यानं शाळेनं मुलांना परीक्षेला बसू दिलं नाही. त्यामुळं दोन्ही मुलांचं वर्ष वाया गेलं.


यासंदर्भात शाळा प्रशासनाची भेट घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी आपलं म्हणणंच ऐकलं नाही. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना पत्र पाठवूनही शाळेचे मुख्य संचालक रायन पिंटो यांनी कोणतीच कारवाई केली नाही.
- गणपती झा, पालक


शाळेनं झा यांच्यासमोर १६ हजार रुपये भरण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्यानंतर मुलाला शाळा सोडल्याचा दाखला देण्यात येईल. त्यानंतर त्यांनी कसंबसं करून १२ हजार रुपये शाळेत भरले. फक्त ४ हजार शिल्लक होते. तरीही शाळेनं त्यांच्या मुलांचा दाखला दिला नाही. त्यामुळे मुलांचं एक वर्ष वाया गेल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.


हेही वाचा - 

रायन कुटुंबीयांना बुधवारपर्यंत अटक न करण्याचे न्यायालयाचे निर्देश



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा