रायन कुटुंबीयांना बुधवारपर्यंत अटक न करण्याचे न्यायालयाचे निर्देश


रायन कुटुंबीयांना बुधवारपर्यंत अटक न करण्याचे न्यायालयाचे निर्देश
SHARES

रायन इंटरनॅशनल स्कूलचे व्यवस्थापक ऑगस्टीन पिंटो, त्यांची पत्नी ग्रेस पिंटो आणि मुलगा रायन पिंटो यांना पुढच्या सुनावणीपर्यंत म्हणजेच बुधवारपर्यंत अटक न करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करताना आपला रायन इंटरनॅशनल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनशी काहीही संबंध नसल्याचे रायन पिंटो याने म्हटले आहे. जे झालं त्याचे मला दु:ख आहे, असे म्हणताना मी स्वतः सेंट झेवियर्स एज्युकेशन ट्रस्टशी संलग्न असल्याचे त्याने म्हटले आहे.

ऑगस्टीन पिंटो रायन इंटरनॅशनल शाळेचे संस्थापक असून त्यांची पत्नी या शाळेच्या व्यवस्थापकीय संचालक आहेत.


गुरुग्राम पोलीस मुंबईत

गेल्या आठवड्यात गुरुग्राम येथील रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये सात वर्षीय विद्यार्थ्याची शाळेच्या बस कंडेक्टरने हत्या केली होती. या प्रकरणामुळे शाळेच्या विश्वस्थांना अटक करण्यासाठी गुरुग्राम पोलीस मुंबईत दाखल झाले असून अटक टाळण्यासाठी पिंटो कुटुंबीयांनी न्यायालयात धाव घेतली होती.

काही कारणांमुळे रायन पिंटो याने मंगळवारी उशिरा अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली. मात्र हे एकच प्रकरण असल्याचे सांगत न्यायालयाने दोन्ही अर्ज एकत्र केले आहेत. न्या. अजय गडकरी यांनी सुनावणी उद्यावर ढकलत या तिघांनाही तोपर्यंत अटक न करण्याचा दिलासा दिला आहे.


मुलाचा मृत्यू दुर्दैवी

पिंटो कुटुंबीयांनी आपल्या अर्जात मुलाचा मृत्यू दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. मात्र त्यासाठी व्यवस्थापनाला दोषी ठरवले जाऊ शकत नाही, त्याच बरोबर ते स्वतः देखील या दुर्दैवी घटनेचे पीडित असल्याचा दावा पिंटो कुटुंबीयांनी आपल्या अर्जात केला आहे.

मुलाच्या मृत्यूने त्याचे वडिल आणि कुटुंबासह शाळेचे विश्वस्त, मॅनेजमेंट कर्मचारी आणि विद्यार्थ्याना देखील दुःख झाल्याचे अर्जात म्हटले आहे. संस्थेच्या ४० वर्षांच्या इतिहासात पाहिल्यांदाच अशी घटना घडल्याचे देखील तिघांच्या अर्जात म्हटले आहे.



हे देखील वाचा -

खासगी शाळांतील मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा