रायन शाळेच्या सीईओची जामिनासाठी याचिका, मंगळवारी सुनावणी


रायन शाळेच्या सीईओची जामिनासाठी याचिका, मंगळवारी सुनावणी
SHARES

हरियाणातील रायन शाळेत शिकणाऱ्या प्रद्युम्न ठाकूर या विद्यार्थ्याच्या हत्येप्रकरणी रायन शाळेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) रायन पिंटो यांनी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात अंतरिम जामिनासाठी याचिका दाखल केली आहे. या प्रकरणावरील पुढील सुनावणी मंगळवारी होणार आहे. पोलीस पिंटो यांचा जबाब नोंदवून घेणार असल्याने अटकेपासून बचाव करण्यासाठी पिंटो यांनी न्यायालयात अंतरिम जामिनाची याचिका दाखल केल्याचे म्हटले जात आहे.

हरियाणातल्या रायन शाळेत शनिवारी प्रद्युमन ठाकूर नावाच्या विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपी बस चालकाला अटक देखील केली आहे. पण शाळा खरी बाब लपवत असल्याचा आरोप प्रद्युमनच्या नातेवाईकांनी केला आहे.

हरियाणात झालेल्या हत्येच्या घटनेनंतर देशभरातील रायन शाळेच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सोमवारपासून शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून शाळा खासगी सुरक्षा कर्मचाऱ्यांसह स्थानिक पोलिसांचीही मदत घेत आहे.

कांदिवलीतील ठाकूर काॅम्प्लेक्समधील रायन इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्यालयात हरियाणातील गुरूग्रामच्या पोलिसांचे पथक तपासणीसाठी आल्याचे म्हटले जात आहे. परंतु स्थानिक पोलिसांनी मात्र या वृत्ताचे खंडन केले आहे. 



हेही वाचा - 

मध्यस्थी पडली महागात, आईस्क्रीमचे पैसे देण्यावरून एकाची हत्या



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा