Advertisement

खासगी शाळांतील मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर


खासगी शाळांतील मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
SHARES

हरियाणातील गुरूग्राम येथील रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये दुसरीच्या विद्यार्थ्याची हत्या झाल्यानंतर खासगी शाळेतील मुलांचा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पालकांकडून भरमसाट फी घेणाऱ्या या शाळांमध्ये मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काहीच उपयोजना केली जात नाही, असा आरोप पालक करत आहेत.

बहुतांश शाळांमध्ये मुलांच्या सुरक्षेसाठी वेगळी काहीच व्यवस्था नसते. खरंतर शाळेत सीसीटीव्ही असणं, मुलांना आणि मुलींना वेगळं बाथरूम असणं. शाळेच्या गेटवर सुरक्षारक्षक असणं आवश्यक आहे. एवढंच नाही, तर शाळेच्या परिसरात दारू, गुटखा विक्रीचं दुकान नसणं बंधनकारक आहे. शाळेच्या इमारतीचं दरवर्षी ऑडिट करणं, शाळेतील अग्निशमन व्यवस्थेचं नूतनीकरण करणं करणं आवश्यक असते. पण बहुतांश खासगी शाळा हे नियम पायदळी तुडवतात आणि त्याचा परिणाम शाळेतील मुलांना भोगावा लागतो.

रायन स्कूलमध्ये घडलेल्या प्रकारानंतर मुंबईतील घाबरलेल्या पालकांनी थेट शाळा गाठली. मुंबईत कांदिवली आणि नवी मुंबईत रायन स्कूल आहे. हरियाणात घडलेला प्रकार मुंबईत घडू नये, यासाठी शाळेने सुरक्षेच्या दृष्टीने लवकरात लवकर पावलं उचलावीत, अशी मागणी पालक करत आहेत. मात्र हा प्रश्न केवळ रायन स्कूलमध्ये शिकणाऱ्या मुलांपुरताच मर्यादीत नाही. तर मुंबईतील अनेक इंटरनॅशनल स्कूलच्या मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे.



आम्ही आमची मुलं शाळेत सोडतो. त्यानंतर त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी शाळेची असते. स्वच्छ बाथरूम, शाळेत सीसीटीव्ही लावणे, अशा बेसिक गोष्टी तरी शाळेनं दिल्या पाहिजेत. आम्ही शाळेला भरसाठ फी देतो. फी घेताना शाळा कधीच पालकांचा विचार करत नाही, दरवर्षी फी वाढवण्यात येते. मात्र मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आल्यावर शाळा जबाबदारी घ्यायला तयार नसते, अशी खंत रायन स्कूलमधील पालकांनी 'मुंबई लाइव्ह'कडे व्यक्त केली.


शाळांमध्ये सीसीटीव्ही लावणं आणि ते चालू स्थितीत असणं बंधनकारक आहे. पण बहुतांश शाळा या नियमांचं पालन करताना दिसत नाही. एखाद्या शाळेने नियम मोडला, तर त्यांना जबर दंड दिला पाहिजे. तरच शाळा दंड होईल या भितीने तरी नियमांचे पालन करतील.

- जयंत जैन, अध्यक्ष, फोरम एज्युकेशन

अभिनेत्री रेणूका शहाणे यांनी ट्वीटरच्या माध्यमातून या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.




डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा