Advertisement

पालकांनो! तुमच्या पाल्याच्या सुरक्षिततेसाठी हे कराच!


पालकांनो! तुमच्या पाल्याच्या सुरक्षिततेसाठी हे कराच!
SHARES

हरियाणातील रायन स्कूलमध्ये चिमुकल्या प्रद्युम्न ठाकूरच्या हत्येमुळे संपूर्ण देश हदरला आहे. प्रत्येक पालकांच्या मनात आता मोठी धाकधुक निर्माण झाली आहे. आपले मुल त्या शाळेत जाते ती शाळा सुरक्षित आहे ना, आपले मुल सुरक्षित आहे ना? याचीच काळजी आता पालकांना लागली आहे.

या घटनेनंतर पालकांमध्येही जागरुकता निर्माण होऊ लागली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून पालकांनी शाळांच्या सुरक्षेबाबत जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. असे असताना प्रत्येक पालकाने आपल्या पाल्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अनेक गोष्टींवर लक्ष देणे गरजेचे आहे. लाखोंचे शुल्क उकळणाऱ्या शाळा असो वा सरकारी शाळा सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना असणे गरजेच आहे. तेव्हा पालकांनो तुमच्या पाल्याच्या सुरक्षिततेसाठी हे कराच.



तुमच्या शाळेत या सुविधा आहेत का?

  1. सीसीटीव्ही -
    शाळेच्या प्रत्येक मजल्यावर चालू स्थितीत सीसीटीव्ही असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे शाळेच्या मुख्यदरवाजावर, टीचर रूममध्ये, प्रत्येक वर्गात शाळेने सीसीटीव्ही लावणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे सीसीटीव्हीचा बॅकअप सेव्ह असणे गरजेचे आहे.
  2. सुरक्षा रक्षक -
    शाळेच्या मुख्यदरवाजावर सुरक्षा रक्षक असणे आवश्यक आहे. जेणेकरून एखादा अनुसुचित प्रकार घडणार नाही याकडे त्यांचे लक्ष असेल. ओळखपत्र असणाऱ्यालाच शाळेत प्रवेश दिला जावा. ओळखपत्राशिवाय कोणत्याच व्यक्तीला शाळेत प्रवेश देता कामा नये.
  3. हेल्पलाईन क्रमांक -
    शाळेत एखादा चुकीचा प्रकार घडला तर शाळेकडे रुग्णवाहीका बोलवण्यासाठी संपर्क क्रमांक असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे शाळेच्या हद्दीतील पोलिसांचा संपर्क क्रमांक शाळेत असणे गरजेचे आहे.
  4. समुपदेशक -
    प्रत्येक शाळेत समुपदेशक असणे आवश्यक आहे. लहान मुलांवर होणारे लैंगिक अत्याचार याविषयी मुलांचे समुपदेशन होणे गरजेचे आहे. गुड टच बॅड टचची माहीती शाळेत देणे आवश्यक आहे.
  5. स्कूल बसची सुरक्षितता -



स्कूल बसमध्ये क्षमतेपेक्षा, आसनांपेक्षा जास्त विद्यार्थी भरले नाहीत ना, याची खात्री पालकांनी अवश्य करून घ्यावी. त्याचप्रमाणे शाळेत ने आण करणाऱ्या बसेसचा शाळेशी करार झाला आहे की नाही? बसमध्ये महिला मदतनीस आहे की नाही? बसच्या ड्रायव्हरवर कोणताही गुन्हा दाखल नाही ना? या सगळ्यांची खात्री करून घेतली पाहीजे.

या वरील गोष्टी तुमच्या शाळेत नसतील तर तुम्ही या ठिकाणी तक्रार करू शकता.

हे ही लक्षात घ्या...

  • पोलिस मित्र अॅप हवाच-

शाळेत मुलावर झालेल्या अत्याचाराविरोधात त्वरित पोलिसांशी संपर्क साधणे आवश्यक आहे. एखादी घडलेली घटना पोलिसांपर्यंत त्वरीत पोहचणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे पोलिसांनी 'पोलिस मित्र' या अॅपची सुरुवात केली आहे. या अॅपद्वारे आपण लहान मुलांवरील अत्याचाराच्या तक्रारी करू शकता.

  • बालहक्क संरक्षण आयोगाकडे मागता येते दाद

राज्यसरकारने २००५ साली बालहक्क संरक्षण आयोगाची स्थापना केली. लहान मुलांवर होणारे अत्याचार, लौंगिक शोषण, बालविवाह याविषयीच्या तक्रारी आपण या ठिकाणी करू शकता.

  • चाईल्ड लाईनसारख्या अन्य एनजीओही मदतीला

ज्ञानदेवी संस्थेने २००१ मध्ये चाईल्ड लाईन या संस्थेची स्थापना केली. या संस्थेमार्फत बालकामगार, शारीरिक अत्याचार, हरवलेली मुले, लैंगिक शोषण, बालविवाह, बालगुन्हेगारी अशा विषयांवर कामे केली जातात.

त्यामुळे आता आपले शाळेत गेलेले पाल्य सुरक्षित रहावे असे वाटत असेल तर वरील गोष्टींची पालकांनी खात्रीकरून घेणे आवश्यक आहे.


हेही वाचा -

प्रद्युम्न हत्या प्रकरण, पोलीस हे खबरदारीचे उपाय करणार!

स्कूलबसमध्ये महिला बसवाहक नेमणार


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा