Advertisement

स्कूलबसमध्ये महिला बसवाहक नेमणार


स्कूलबसमध्ये महिला बसवाहक नेमणार
SHARES

हरियाणातील गुरूग्राममधील रायन इंटरनॅशनल स्कूलचा बस कंडक्‍टर अशोक कुमार याने गेल्याच आठवड्यात दुसरीत शिकत असलेल्या प्रद्युम्न ठाकूर या मुलाची गळा चिरुन हत्या केली होती. याप्रकरणी कुमारला अटक करण्यात आल्यानंतर पुन्हा एकदा शाळेतील मुलांची सुरक्षा आणि स्कूल बस चालक संघटनेकडे लक्ष वेधले गेले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी यापुढे शाळेच्या बसमध्ये महिला बसवाहक, क्लिनर नेमण्याचे स्कूल बस संघटनेने जाहीर केले आहे.

सध्या मुंबईतील शाळांसाठी ८ हजार स्कूलबस सेवा पुरवतात. त्यामुळे किमान १५ हजार महिला वाहकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या महिला वाहकांना शाळेने परवाना द्यावा, अशी मागणी स्कूल बस चालक संघटनेचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी केली आहे.

मुंबईमध्ये ८ हजार तर राज्याभरात ४० हजार विविध आसनी स्कूलबस सेवा पुरवल्या जातात. त्यातील १५ हजार स्कूलबसमध्ये पुरूष वाहकाबरोबर महिला सुरक्षारक्षक असतात. पण आता पुरूष वाहकाजागी महिला वाहक नेमण्याचा निर्णय घेतल्याची माहिती गर्ग यांनी दिली.

या आधी अनिल गर्ग यांनी याविषयी सरकारकडे या महिला वाहक परवान्याविषयी विचारणा केली होती. मात्र सरकारकडून कोणताच प्रतिसाद त्यांना मिळाला नाही. सरकारने याबाबत वेळेत पावल उचली असती, तर आज महिला वाहक बसमध्ये असते. त्याचप्रमाणे बसचालक, वाहकांसाठी वेगळ्या टॉयलेटची सुविधा शाळेत असणे आवश्यक आहे. तरच अशा घटनांना आळा बसेल, अशी मागणीही त्यांनी केली आहे.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा