पिंटो कुटुंबीयांचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला


पिंटो कुटुंबीयांचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला
SHARES

बहुचर्चीत प्रद्युम्न ठाकूर हत्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने पिंटो कुटुंबीयांचा ट्रांसिट अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळून लावला आहे. या प्रकरणी निकाल देत न्यायालयाने रायन कुटुंबीयांना सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी शुक्रवारी ५ वाजेपर्यंतची वेळ दिली आहे.

तोपर्यंत त्यांना अटक करण्यात येऊ नये, असा तात्पुरता दिलासाही न्यायालयाने दिला आहे. गुरुवारी रात्री ९ वाजेपर्यंत तिघांनाही आपले पासपोर्ट मुंबई पोलिसांकडे जमा करायचे आहेत. अन्यथा त्यांना सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येणार नसल्याचे म्हणत उच्च न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे.


अशा प्रकारे ट्रांजिट अटकपूर्व जामीन देण्याची कोणतीही तरतूद कायद्यात नसून आरोपींच्या वाकिलांनी चुकीचा दरवाजा ठोठावला आहे.
- सुशील टेकरीवाल, ठाकूर यांचे वकील

राज्य सरकारने देखील या ट्रांसिट अटकपूर्व जामिनाला कडाडून विरोध केला आहे. यावेळी राज्य सरकारकडून सुरेश बिजलानी हत्या प्रकरणात आरोपी सुनील लोहारियाचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाने रद्द केल्यावर सुनील लोहारियाने मध्य प्रदेशातील न्यायालयातून ट्रांसिट अटकपूर्व मंजूर केला होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयावर ताशेरे ओढल्याचे सरकारी पक्षाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

गेल्या आठवड्यात गुरुग्राम येथील रायन इंटरनॅशनल शाळेत कंडक्टरने शाळेतच सात वर्षीय प्रद्युम्न ठाकूर नावाच्या मुलाची हत्या केली होती. या शाळेचे संस्थापक पिंटो कुटुंबिय मुंबईत रहात असून त्यांच्या चौकशीसाठी हरियाणा पोलीस मुंबईत दाखल आले होते.


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा