कमला मिल आग: १ अबोव्हच्या मॅनेजर्सला जामीन

  • मुंबई लाइव्ह टीम & निलेश अहिरे
  • क्राइम

कमला मिल्स कंपाऊंडमध्ये लागलेल्या आग प्रकरणातील आरोपी आणि १ अबोव्ह पबचे मॅनेजर केव्हिन बावा तसेच लिस्बन लोपेज यांना बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन दिला. बावा आणि लोपेज या दोघांना ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी ३१ डिसेंबर रोजी अटक केली होती.

लोकांना मदत केल्याचा दावा

१ अबोव्ह पबमध्ये आग लागल्यावर लोपेज आणि बावा यांनी घटनास्थळावरून पळ काढण्याऐवजी आगीत अडकलेल्या लोकांना मदत केली, असं म्हणणं न्यायालयापुढे त्यांच्या वकिलांनी मांडलं.

आरोपपत्र दाखल

फेब्रुवारीत भोईवाडा मॅजिस्ट्रेट न्यायालयात पोलिसांनी १२ आरोपींविरोधात २७०६ पानांचं आरोपपत्र दाखल केलं होतं. यामध्ये कमला मिल्स कंपाऊंडचा सहमालक रमेश गोवानी आणि रवी भंडारी यांच्यासोबत १ अबोव्ह आणि मोजोस बिस्ट्रो बचे मालक कृणाल संघवी, जीगर संघवी, अभिजीत मानकर, युग तुली, युग पाठक, केविन बावा, लिस्बन लोपेज, शहजाद मुमताज अली आणि अग्निशमन अधिकारी राजेंद्र पाटील यांचा समावेश आहे.

गेल्या वर्षी २७ डिसेंबर रोजी कमल मिल्स कंपाऊंडमध्ये आग लागली होती. या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला होता. तर १२ जण जखमी झाले होते.


हेही वाचा-

कमला मिल आगीला तत्कालीन सरकारच जबाबदार- मुख्यमंत्री

मोजोस बिस्ट्रो, वन अबोव्हला परवानगी दिलीच कशी? उच्च न्यायालयानं टोचले महापालिकेचे कान


पुढील बातमी
इतर बातम्या