पोलिस बहिणींच्या हस्ते राखीबांधून गृहमंत्र्यांनी केला रक्षाबंधन साजरी

सध्याच्या कोरोना परिस्थितीमुळे आपले घरदार, नातेसंबंध बाजूला ठेवून लोकांच्या रक्षणार्थ झटणाऱ्या महिला पोलिसांचं करावं तितकं कौतुक कमीच आहे. याच पोलिस दलातील महिला पोलिसांना भावाची कमी जाणवू नये. या अनुषंगाने गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महिला पोलिसांकडून राखीबांधून घेत राखीपौर्णिमेचा सण साजरी केला. त्यावेळी कुटुंबप्रमुख म्हणून गृहमंत्र्यांनी महिला पोलिसांचे रक्षण आणि काळजीची संपूर्ण जबाबदारी मोठा भाऊ या नात्याने स्विकारली.

हेही वाचाः- गुड न्यूज! मुंबईतील सर्व दुकाने आता एकाचवेळी सुरू राहणार

रक्षाबंधनच्या निमिताने गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महिला पोलीस  अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी सोमवारी संवाद साधला. त्यांची ,त्यांच्या कुटुंबियांची विचारपूस केली. कोविड१९ च्या लढ्यात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आमच्या महिला पोलीस कर्मचारी भगिनी नेटाने लढा देत आहेत. त्यामुळे महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या सन्मानार्थ त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी कर्तव्याबरोबर सामाजिक जाणिवेतून लोकहित जपणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांसोबत रक्षाबंधन साजरे केले.  या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमात फुटपाथवरील बेघर महिलेला प्रसुती करण्यास मदत करत तिला व तिच्या बाळाला सुखरूप दवाखान्यात भरती करणाऱ्या महिला पोलीस उपनिरीक्षक प्रिया गरुड आणि महिला पोलीस शिपाई अस्मिता जाधव उपस्थित होत्या. तसेच पनवेल नजीकच्या ज्ञानाई माध्यमिक विद्यालयातील ५० विद्यार्थ्यांचा १० वी पर्यंतच्या शिक्षणाचा खर्च उचलून त्यांना दत्तक घेणाऱ्या महिला पोलीस नाईक रेहाना शेख यांच्यासोबत मुंबईच्या रस्त्यांवरील अनेक निराधारांना मदतीचा हात देणाऱ्या महिला पोलीस नाईक रंजनी जबारे, तसेच एकाच दिवशी ४ बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या महिला पोलीस नाईक संध्या शिलवंत उपस्थित होत्या. तसेच कोविड१९ च्या काळात कर्तव्य बजावताना कोरोनाने संक्रमित होऊन त्यावर यशस्वीरीत्या मात करणाऱ्या महिला पोलीस शिपाई रुपाली डावके आणि सविता नवघणे या देखील उपस्थित होत्या.

हेही वाचाः- दिलासादायक! मुंबईतील कंटेन्मेंट झोन्स २२ टक्क्यांनी घटले

या सर्व महिला कर्मचाऱ्यांशी चर्चा करून माझ्या पुढील कामांसाठी प्रेरणा व ऊर्जा मिळाली. पोलीस दलातील सर्व महिला कर्मचाऱ्यांचा मोठा भाऊ या नात्याने मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने गृहमंत्र्यांनी सर्वांना मनापासून शुभेच्छा दिल्या. पोलीस दलाचा कुटुंबप्रमुख नात्याने  मला सर्व महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा बरोबरीने महाराष्ट्र पोलीस दलाचा सार्थ अभिमान आहे.असे मनोगत गृहमंत्र्यांनी व्यक्त केले.

पुढील बातमी
इतर बातम्या