गरीब मुलं दत्तक घेऊन महिला पोलिसाने बजावली 'ड्युटी'

रोजंदारीवर काम करणाऱ्या या आदीवासी पाड्यातील मुलांच्या वडिलांचे लाँकडाऊनमुळे काम सुटले. कसा बसा महिना निघाला, माञ आता त्या कुटुंबाला केवळ एका वेळचं जेवण मिळणे ही मुश्किल झाल्याने जेवणासाठी ही मुले शाळेत येत असल्याचे वाचल्यानंतर रेहाना यांचे मन भरून आले,

गरीब मुलं दत्तक घेऊन महिला पोलिसाने बजावली 'ड्युटी'
SHARES
कोरोना या संसर्गामुळे सर्वञ हाहाकार माजला असताना, रोजदारीवर पोट असलेल्या अनेकांना एका वेळचे जेवण मिळणे ही मुश्किल होऊन बसले आहे. नवी मुंबईतल्या अशाच एका आदीवासीपाड्यातल्या मुलांवर ओढवलेल्या उपासमारीची कहानी कळताच, मुंबईतल्या एका महिला पोलिस नाने मुलीच्या वाढदिवसादिवशी 'त्या' आदीवासी पाड्यातल्या मुलांना दत्तक घेत त्यांचे 'मातृत्व' स्विकारले आहे. (बक्कल क्रमांक 0549) रेहाना नासिर शेख असे या मर्दानीचे नाव असून त्यांच्या कामगिरीची सध्या मुंबई पोलिस दलात चर्चा आहे.


नायगांवच्या पोलिस वसाहतीत रेहाना शेख या त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. मुंबईत सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असताना पोलिस हे अहोराञ नागरिकांच्या सुरक्षेसाठी झटत आहेत. त्यापैकीच एक रेहाना या सुद्धा आहे. बाहेरील परिस्थिती इतकी गंभीर होत चालली आहे की, हातावर पोट असलेल्यांचे हाल  बघता बघवत नाहीत. अशा पिचलेल्या गरीबांसाठी काही तरी करायला हवे हे विचार रेहाना यांच्या कायम मनात यायचे, दरम्यान मुलीच्या वाढ दिवसा दिवशी रेहाना यांच्या मोबाइलवर नवी मुंबईतील पनवेल येथील धामणी गावच्या आदीवासी पाड्यावर ओढावलेल्या संकटाची माहिती आली होती.  रोजंदारीवर काम करणाऱ्या या आदीवासी पाड्यातील मुलांच्या वडिलांचे लाँकडाऊनमुळे काम सुटले. कसा बसा महिना निघाला, माञ आता त्या कुटुंबाला केवळ एका वेळचं जेवण मिळणे ही मुश्किल झाल्याने जेवणासाठी ही मुले शाळेत येत असल्याचे वाचल्यानंतर रेहाना यांचे मन भरून आले, पैसा नसल्यामुळे अनेक मुलांवर शिक्षण सोडण्याची वेळ आली होती. ही माहिती वाचल्यानंतर या मुलांना दत्तक घेण्याचा, त्यांच्या शिक्षणाचा सर्व खर्च उचलण्याचा मानस रेहाना यांनी केला.

 रेहाना यांनी पनवेलमधील या गावातील शाळेला भेट दिल्यानंतर  या विद्यार्थ्यांची करुण कहानी समोर आली. शाळेतील शिक्षकांच्या मदतीने रेहाना यांनी 50 विद्यार्थ्यांना दत्तक घेतले, ऐवढेच काय तर कोरोना संसर्गातही या मुलांपर्यंत मास्क किंवा सँनिटायझर नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना त्या वस्तू पुरवल्या, त्याच बरोबर ज्ञानाई माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना भेटवस्तू  आणि खाद्यपदार्थ ही पाठविले. या 50 विद्यार्थ्यांचा दहावीपर्यंतच्या शिक्षणाचा सर्व खर्च त्या करणार आहेत. सध्या त्या रहात असलेल्या पोलिस इमारतीत कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने त्यांना होम क्वारंन्टाईन करण्यात  आले आहे. माञ घरी राहून ही त्या पोलिस आणि गोरगरीबांसाठी जमेल तितकी मदत करत आहेत. त्यांच्या या कार्याची सध्या मुंबई पोलिस दलात चर्चा असून सर्वच स्तरावरून त्यांचे कौतुक केले जात आहे.

 
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा