Advertisement

महिला पोलिस अधिकाऱ्यांची ऑनड्युटी वटपोर्णिमा

पोलीस दलात काम करणाऱ्या या महिला पोलीस अधिकाऱ्यांची अनोखी वटपोर्णिमा...

महिला पोलिस अधिकाऱ्यांची ऑनड्युटी वटपोर्णिमा
SHARES
Advertisement

कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या परिस्थितीत डॉक्टर, नर्सेस, सफाई कर्मचारी आणि पोलीस हे कोरोनाशी दोन हात करत आहेत. नागरिकांच्या संरक्षणासाठी ते लढा देत आहेत. यासोबतच कुटुंब, संसार या गोष्टी देखील ते सांभाळत आहेत. एकप्रकारे त्यांची तारेवरची कसरत चालू आहे.

वटपोर्णिमा हा सण यावर्षी साध्या पद्धतीनं साजरा केला गेला. कोरोनाव्हायरसमुळे अनेकांनी घरीच राहून पुजा करणं पसंत केलं. तर काही महिलांनी श्रृंगार करून वडाची पुजा केली. पण आपलं कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलिसांचं काय? तर पोलीस दलातील महिलांचं आणि तिच्या कर्तव्याचं एक अनोख रुप फोटोद्वारे समोर आलं आहे.

वटपौर्णिमा म्हटलं की, घरात गोडाचं जेवण, देवाला नैवेद्य, नवीन साडी, श्रृगांर अशा अनेक गोष्टी आल्या. पण पोलीस दलात काम करणाऱ्या या महिला पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या कर्तव्यालाचं लेणं मानून पोलीस गणवेशातच वडाची पूजा केली आहे.

गृहमंत्री अनिल देशमुखांनी यासंबंधी एक ट्विट केलं आहे. यामध्ये पोलीस महिला वडाची पूजा करत असल्याचे काही फोटो शेअर करत त्यांनी या महिलांचं कौतूक केलं आहे. खरंतर आपलं काम आणि आपली देशसेवा यासाठी अहोरात्र काम करणाऱ्या पोलीस दलाचे आभारच मानायला हवेत. आज त्यांच्या सतर्कतेमुळे आपण सुरक्षित आणि आनंदानं सण साजरे करू शकतो.

अनिल देशमुखांनी ट्वीट करताना लिहलं की, 'वटपौर्णिमा सण सगळीकडे साजरा करण्यात आला. #Covid19 च्या लढ्यात लढणाऱ्या आमच्या महिला #पोलीस भगिनींनी कर्तव्य बजावत असतानाच वटपौर्णिमा साजरी करून हा सण आनंदात साजरा केला. या भगिणीचं कर्तव्याप्रती समर्पण #महाराष्ट्र कधीही विसरणार नाही.'हेही वाचा

रुग्णांच्या काळजीपोटी पोलिसाने स्वत:च्या गाडीचेे केलं रुग्णवाहिकेत रुपांतर

आकाश तुझा आम्हाला अभिमान वाटतो, फोन करून गृहमंत्र्यांनी केलं अभिनंदन

संबंधित विषय
Advertisement