Advertisement

आकाश तुझा आम्हाला अभिमान वाटतो, फोन करून गृहमंत्र्यांनी केलं अभिनंदन

मुंबई पोलीस दलातील हवालदार असलेले आकाश गायकवाड यांनी बुधवारी ओपन हार्ट सर्जरी होणाऱ्या एका छोट्या मुलीला स्वतःचं रक्त देऊन माणुसकीचे नातं जपलं.

आकाश तुझा आम्हाला अभिमान वाटतो, फोन करून गृहमंत्र्यांनी केलं अभिनंदन
SHARES
Advertisement

मुंबई पोलीस दलातील हवालदार असलेले आकाश गायकवाड यांनी बुधवारी ओपन हार्ट सर्जरी होणाऱ्या एका छोट्या मुलीला स्वतःचं रक्त देऊन माणुसकीचे नातं जपलं, त्याबद्दल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी "आकाश तुझा आम्हाला अभिमान आहे" अशा शब्दात त्याचे फोन करून विशेष अभिनंदन केले.

बुधवारी ३ जून रोजी हिंदुजा रुग्णालय येथे १४ वर्षांच्या सना फातिम खान या मुलीला अचानक ओपन हार्ट सर्जरी वेळी A+ रक्त लागणार होते. मुंबईमध्ये निसर्ग चक्रीवादळ व कोरोनामुळे रक्त देण्यासाठी वैद्यकीय दृष्ट्या योग्य असे कोणीही रुग्णालयात येऊ शकले नाहीत. अशा गंभीर परिस्थितीत दवाखान्यात नेमणुकीस असलेले ताडदेव पोलिस स्टेशनचे ऑन ड्युटी पोलीस (क्रमांक१४००५५) आकाश बाबासाहेब गायकवाड हे फक्त माणुसकी हाच आपला धर्म समजून व पोलीस ब्रीदवाक्य सद्रक्षणाय यास अनुसरून तिच्यासाठी अशा संकटप्रसंगी धावून आले. आपले रक्तदान करून या मुलीला जीवनदान दिले. 


 कोणत्याही संकटसमयी पोलीस हे देवदूत बनून मदतीला येतात. हे यातून पुन्हा सिद्ध झाले. कोरोना संसर्ग असो की निसर्ग चक्रीवादळ. सर्वसामान्य नागरिकांसाठी पोलीस दलाचा कायमच भक्कम आधार आहे. आकाश गायकवाड यांच्यासारख्या योद्ध्यांना माझा सलाम! या संपूर्ण पोलीस कुटुंबाचा प्रमुख म्हणून मला आपल्या पोलीस दलाचा अभिमान आहे. शब्दात गृहमंत्र्यांनी आकाशचा गौरव केला.हेही वाचा -

 मुंबईतील कोरोना चाचण्या वाढविण्याची नितांत गरज, देवेंद्र फडणवीसांची मागणी

अनुपस्थित कर्मचाऱ्यांना पालिकेचा दणका, कामावर हजर न राहिल्यास नोकरी जाणार
संबंधित विषय
Advertisement