Advertisement

अनुपस्थित कर्मचाऱ्यांना पालिकेचा दणका, कामावर हजर न राहिल्यास नोकरी जाणार

कोरोना होईल या भितीने कामावर न येणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता मुंबई महापालिकेने चांगलाच दणका दिला आहे.

अनुपस्थित कर्मचाऱ्यांना पालिकेचा दणका, कामावर हजर न राहिल्यास नोकरी जाणार
SHARES
Advertisement

कोरोना होईल या भितीने कामावर न येणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता मुंबई महापालिकेने चांगलाच दणका दिला आहे.  ७२ तासांत कामावर हजर न राहिल्यास या कर्मचाऱ्यांना बडतर्फ केलं जाणार आहे. त्यांच्या जागी तातडीने कंत्राटी स्‍वरुपात नवीन कर्मचाऱ्याची नियुक्‍ती करण्‍यात येणार आहे. महापालिका आयुक्‍त इक्‍बाल सिंह चहल यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

कोरोना रुग्‍णांसह इतर रुग्‍णांना आवश्‍यक ते वैद्यकीय उपचार वेळच्‍यावेळी मिळणे गरजेचे आहे. या अनुषंगाने महापालिकेच्‍या 7 प्रमुख सर्वोपचार रुग्‍णालयांसह 16 उपनगरीय रुग्‍णालये, प्रसूतिगृहे, दवाखान्यांमार्फत मुंबईकरांना अव्‍याहतपणे वैद्यकीय सेवा-सुविधा देण्‍यात येत आहेत. मात्र काही ठिकाणी वर्ग 3 व वर्ग 4 चे काही कर्मचारी वारंवार अनुपस्थित राहत असल्‍याचे निदर्शनास आलं आहे.

या कर्मचा-यांनी देशहिताच्‍या दृष्‍टीने आणि‍ मानवतेच्‍या दृष्‍टीकोनातून आपल्‍या कर्तव्‍यावर हजर राहण्‍याचे आवाहन यापूर्वीही महापालिकेद्वारे करण्‍यात आलं आहे. महापालिका आयुक्‍त इक्‍बाल सिंह चहल यांनी वारंवार अनुपस्थित राहणा-या कर्मचा-यांना एक शेवटची संधी दिली आहे. आपल्‍या कर्तव्‍यावर हजर न होणा-या कर्मचा-यांना साथरोग नियंत्रण कायदा व आपत्ती नियंत्रण कायद्यानुसार 72 तासांची अंतिम नोटीस देण्‍याचे निर्देश दिले आहेत. त्‍यानंतरही कर्तव्‍यावर रुजू न होणा-या कर्मचा-यांना बडतर्फ ) करुन त्‍यांच्‍याजागी तातडीने कंत्राटी स्‍वरुपात नवीन व्‍यक्‍तीची नियुक्‍ती करण्‍याचे निर्देशही महापालिका आयुक्‍तांनी दिले आहेत.

महापालिका आयुक्‍तांच्‍या प्रमुख मार्गदर्शनात व्हिडीओ कॉन्‍फरन्सिंगद्वारे एका विशेष बैठकीचे आयोजन गुरूवारी करण्‍यात आलं होतं. या बैठकीला प्रधान सचिव व महापालिकेच्‍या विशेष कार्याधिकारी आणि  महापालिकेच्‍या रुग्‍णालयांचे अधिष्‍ठाता, सार्वजनिक आरोग्‍य खात्‍याचे वरिष्‍ठ अधिकारी यांच्‍यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

या बैठकीत रुग्‍णालयातील मनुष्‍यबळ व्‍यवस्‍थापनाबाबत सविस्‍तर चर्चा झाली. सध्‍या रुग्‍णालयातील अनेक कर्मचारी वारंवार अनुपस्थित राहत आहेत. यामुळे रुग्‍णालयात कर्तव्‍यावर उपस्थित राहत असलेल्‍या डॉक्‍टर – नर्स - वैद्यकीय कर्मचारी यांच्‍यावर कामाचा अतिरिक्‍त ताण येत आहे. परिणामी रुग्‍णालयाचे सुयोग्‍य व परिपूर्ण व्‍यवस्‍थापन करणे दिवसेंदिवस कठीण होण्‍यासह वैद्यकीय सेवा-सुविधांवर प्रतिकूल परिणाम होण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही. या दोन्‍ही बाबी लक्षात घेता अनुपस्थित असणा-या कर्मचा-यांनी तात्‍काळ कामावर हजर होणे गरजेचे व आवश्‍यक आहे.

 संबंधित कर्मचा-यांना महापालिका प्रशासनाद्वारे यापूर्वी अनेकदा कर्तव्‍यावर हजर राहण्‍याचे आवाहन करण्‍यात आले आहे. त्‍याचबरोबर महापालिकेच्‍या सेवा नियमावलीनुसार उपस्थित राहण्‍याचे आदेश देखील वेळोवेळी देण्‍यात आले आहेत. मात्र, तरीही अनेक कर्मचारी अद्यापही कामावर हजर झालेले नाहीत. ही बाब लक्षात घेऊन महापालिका आयुक्‍तांनी आजच्‍या बैठकीदरम्‍यान या कर्मचा-यांना शेवटची संधी म्‍हणून 72 तासांची अंतिम नोटीस देण्‍याचे निर्देश दिले आहेत. ही नोटीस साथरोग कायद्यानुसार व आपत्ती व्‍यवस्‍थापन कायद्यानुसार देण्‍यात येणार आहे. तसेच ज्‍या कर्मचा-यांचे वय ५५ वर्षे किंवा अधिक आहे आणि‍ ज्‍यांना काही आजार आहे, त्‍यांना ‘नॉन कोविड’ कामे दिली जातील, असेही नोटीशीत  नमूद केलं आहे.हेही वाचा - मुंबईतील कोरोना चाचण्या वाढविण्याची नितांत गरज, देवेंद्र फडणवीसांची मागणी
संबंधित विषय
Advertisement