रुग्णांच्या काळजीपोटी पोलिसाने स्वत:च्या गाडीचेे केलं रुग्णवाहिकेत रुपांतर

रुग्णवाहिके च्या अनुपलब्धतेमुळे रुग्ण दगावल्याचही उदाहरणे आहेत. अशा परिस्थितीत पर्याय उपलब्ध करणाऱ्या तेजस यांचे सध्या पोलीस दलातून कौतुक सुरू आहे.

रुग्णांच्या काळजीपोटी पोलिसाने स्वत:च्या गाडीचेे केलं रुग्णवाहिकेत रुपांतर
SHARES
कोरोनाच्या परिस्थितीत ठिक ठिकाणी पोलिसांमधील देव माणसाचे दर्शन आपल्याला ठिक ठिकाणी दर्शन झाले. अशाच वर्दीतल्याा एका देव माणसाची चर्चा सध्या सुरू आहे. कोविड रुग्णांना रुग्णालयात नेहण्यासाठी रुग्णवाहिका लवकर मिळत नसल्याने या पोलिस शिपायाने चक्क स्वत:च्या गाडीचे रुग्णवाहिकेत रुपांतर करून अनोखी सेवा सुरू केली आहे.

मुंबई पोलिस दलातील कफपरेेेड पोलिस ठाण्यात पोलिस शिपाई या पदावर तेजस सोनावणेे हे कार्यरत आहेत. कफपरेड मधील बहुतांस भाग हा जरी उच्चभ्रूवस्तीचा असला. तरी गणेशमूर्तीनगर, कोळीवाडा असा बहुतांस भाग हा झोपडपट्टी परिसर आहे. त्यामुळेे या ठिकाणी कोविड रुग्णांची संख्या मागील अनेक दिवसांपासून वाढतच होती. रुग्णांना रुग्णालयात नेहण्यासाठी रुग्णवाहिका या लवकर उपलब्ध होत नव्हत्या, तासंतास प्रतिक्षेनंतर या रुग्णांंसाठी रुग्णवाहिका उपलब्ध होत होत्या. अशातच दोन आठवडय़ांपूर्वी एक तरुण धावत माझ्याकडे आला. त्याच्या पत्नीला प्रसूतिकळा सुरू झाल्या होत्या. तिला लवकरात लवकर रुग्णालयात नेणे आवश्यक होते. मदतीसाठी मी ही रस्त्यावर वाहनांची शोधाशोध करत होतो. पण रस्त्यावर एकही वाहन नव्हते. हा प्रसंग मनाला चटका लावून गेला. त्याच वेळी मिञाची उभी असलेली गाडी घेऊन त्या गाडीचेे रुग्णवाहिकेत रुपांतर करून रुग्णांंची होणारी  गैरसोय टाळली.


गाडीमध्ये रुग्णाला झोपवता येईल आणि एखाद-दुसरा नातेवाईक सोबत बसू शके ल, अशी व्यवस्था करून घेतली. आता हे विशेष वाहन गणेशमूर्तीनगरच्या तोंडावर २४ तास उभे असते, असे तेजस यांनी सांगितले. या वाहनातून तेजस स्वत: रुग्णांना रुग्णालयात सोडतात. रुग्णांचा खोळंबा होऊ नये म्हणून याच वस्तीतल्या एका चालक तरुणाला सज्ज ठेवण्यात आले आहे. वस्तीतले रुग्ण तेजस यांच्या रुग्णवाहिके तून कामा, जेजे, नायरसह सेंट जॉर्ज रुग्णालयात पोहोचत आहेत. रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने अनेकांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे. रुग्णवाहिके च्या अनुपलब्धतेमुळे रुग्ण दगावल्याचही उदाहरणे आहेत. अशा परिस्थितीत पर्याय उपलब्ध करणाऱ्या तेजस यांचे सध्या पोलीस दलातून कौतुक सुरू आहे.


संबंधित विषय