ऊर्जामंत्र्यांनी केली फसवणूक म्हणत मनसेची थेट पोलिसांत तक्रार

राज्यात मागील अनेक दिवसांपासून वाढीव वीज बिलाहून राजकारण चांगलचं तापलं आहे. मात्र वाढीव वीज बिलात नगरिकांना सवलत देण्यात येईल असे आश्वासन देऊन त्याची पूर्तता न केल्याबाबत राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांच्या विरोधात मनसैनिकांनी आक्रमक पवित्रता घेतला आहे. कांदिवलीच्या समतानगर, शिवाजीपार्क पोलिस ठाण्यात मनसैनिकांनी मंत्री नितीन राऊत यांच्यासह ऊर्जा सचिव व बेस्ट महाव्यवस्थापक यांच्यावर आर्थिक फसवणुकीची तक्रार मनसेने शिवाजीपार्क पोलिस ठाण्यात केली आहे. याबरोबर मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी देखील वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात ही तक्रार दाखल केली आहे.

हेही वाचाः- वाढीव वीजबिला विरोधात राज्यात मनसे कार्यकर्ते आक्रमक

मागील अनेक दिवसांपासून वाढीव वीजबिलाच्या मुद्द्यावरुन मनसेचे कार्यकर्ते राज्यभरात जिल्हाधिकारी कार्यालयांवर आंदोलन करत होते. मुंबईतील वांद्रे येथील जिल्हाधिकाऱ्या कार्यावर मनसेच्या नेत्यांनी मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं होतं. मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, नाशिक, औरंगाबाद अशा अनेक प्रमुख शहरांमध्ये मनसेचे शेकडो कार्यकर्ते वीजबिलमाफीची मागणी करत रस्त्यावर उतरले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तोडफोड करु नये असं आवाहन कार्यकर्त्यांना केलं आहे. मात्र तरीही वाढीव वीज बिल ही नागरिकांना येत असल्याने मनसेने आक्रमक भूमिका घेत, थेट पोलिसात उर्जा मंत्र्यांविरोधात तक्रार नोंदवली आहे.

हेही वाचाः- अंडर-१८ खेळाडूंसाठी बाऊन्सरवर बंदी घालण्याची मागणी

मनसेचे माहीम विधानसभा विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या कार्यकर्त्यांनी शिवाजीपार्क पोलिस ठाण्यात भेट देत शिवाजीपार्क पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना तक्रार दाखल करून घेण्यासाठी निवेदन सादर केले.कोरोनाच्या संकटकाळात टाळेबंदी असताना महावितरणकडून वीज मीटर रीडिंगसाठी प्रतिनिधी पाठविण्यात आले नाहीत. या काळात ग्राहकांना वीज वापरांपेक्षा अधिकचे बिल बेस्ट कडून पाठविण्यात आले होते. लॉकडाउनमुळे उत्पन्नाचे स्त्रोत बंद असताना वाढीव वीज बिल पाहून ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. तसेच ग्राहकांमध्ये संतापाची लाटही पसरली होती.

हेही वाचाः- प्रजासत्ता ही मोदीसत्ता होत चाललीय, काँग्रेसचा टोला

 याबाबत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपाल कोशयारी यांची भेट घेत वीज बिलाबाबत चर्चा केली होती. सातत्याने याचा पाठपुरावा करूनही दिवाळी नंतर ऊर्जा मंत्र्यांनी घुमजाव केल्याचे मनसेचे म्हणणे आहे. वीज बिलात सवलत न देता मीटर रीडिंग नुसार बिल भरावेच लागेल असे सांगण्यात आले. त्यामुळे नागरिकांची एकप्रकारे आर्थिक फसवणूकच करण्यात आली. या कारणामुळेच तक्रार दाखल केली असल्याचे किल्लेदार यांनी सांगितले.

पुढील बातमी
इतर बातम्या