Advertisement

अंडर-१८ खेळाडूंसाठी बाऊन्सरवर बंदी घालण्याची मागणी

कनकशन प्रकरणातील स्पेशालिस्टनं क्रिकेट अधिकाऱ्यांना १८ वर्षांखालील खेळाडूंविरुद्ध बाऊन्सरचा वापर करण्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

अंडर-१८ खेळाडूंसाठी बाऊन्सरवर बंदी घालण्याची मागणी
SHARES

कनकशन प्रकरणातील स्पेशालिस्टनं क्रिकेट अधिकाऱ्यांना १८ वर्षांखालील खेळाडूंविरुद्ध बाऊन्सरचा वापर करण्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. त्यामुळं प्रदीर्घ काळ निर्माण होणाऱ्या समस्यांवर मर्यादा आणता येणार आहे. नियम बनविणाऱ्या मेरिलबोन क्रिकेट क्लबनं (एमसीसी) गोलंदाजांना आखुड टप्प्याच्या चेंडू टाकण्याच्या परवानगीवर चर्चा व विचारप्रक्रिया सुरू केली आहे.

'ज्यावेळी तुम्ही युवा अवस्थेतून प्रौढ होता त्यावेळी तुमच्या मेंदूचाही विकास होत असतो आणि अशा स्थितीत तुम्ही कनकशनपासून बचाव करण्यास प्रयत्नशील असाल. आपण कुठल्याही वयात कनकशनपासून बचाव करण्यासाठी प्रयत्नशील राहाल; पण युवासाठी ही धोकादायक बाब आहे', असं डोक्याला झालेल्या दुखापतीसोबत जुळलेल्या आंतरराष्ट्रीय शोध संस्थेचे मीडिया संचालक मायकल टर्नर यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं.

'या वयोगटातील (किशोर) खेळाडूंचा कनकशनपासून बचाव करण्यासाठी नियमांमध्ये बदल करणं सुनिश्चित करायला हवं. याचा अधिकाऱ्यांनी गांभीर्यानं विचार करायला हवा. हेल्मेट केवळ फ्रॅक्चरपासून बचाव करते, कनकशनपासून नाही', असंही त्यांनी म्हटलं.

कमी वयात खेळाडूंच्या डोक्याला दुखापत झाली तर प्रदीर्घकालिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. युवा खेळाडूंच्या मेंदूवर याचा जास्त गंभीर व दीर्घकालिक परिणाम होण्याची शक्यता आहे. कारण या कालावधीत तुमच्या मेंदूचाही विकास होत असतो. त्यामुळं 'सिनिअर क्रिकेटपटूंसह स्पर्धेत सहभागी होणाऱ्या १८ वर्षांखालील खेळाडूंच्या आई-वडिलांना याची कल्पना असायला हवी. त्यासाठी त्यांची परवानगी मिळवायला हवी', असा सल्ला टर्नर यांनी सल्ला दिला आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा