रिपब्लिक चॅनेल पाहून माथेफिरूने दिली थेट आयुक्तांना धमकी

टिआरपी  घोटाळ्यात  नाव आलेल्या रिपब्लिक चॅनेल पाहून डाॅक्टरकीचे शिक्षण घेणाऱ्या २१ वर्षीय तरुणाने थेट मुंबईच्या पोलिस आयुक्तांना धमकावल्याची घटना उघडकीस आली आहे. सोशल मिडियाचा वापर करून त्याने ही धमकी दिल्याचे कळते. या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी त्या तरुणाला ताब्यात घेतले आहे.

हेही वाचाः- बाॅलिवूडला संपवण्याचे प्रकार सहन करणार नाही- उद्धव ठाकरे

मुंबईत एमबीबीएसचे (MBBS) शिक्षण घेणारा २१ वर्षांचा विद्यार्थी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात अक्टीवर असतो. मागील अनेक दिवसांपासून तो रिपब्लिक चॅनेल सातत्याने पहायचा. त्यामुळे त्याच्या स्वभावात देखील बदल झाला होता.  सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात ( Sushant Singh Rajput Suicide Case) या वाहिनीने केलेल्या वार्तांकनावरुन हा तरुण प्रभावित झाल्याचे पुढे आल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केला आहे. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी चुकीचा तपास केल्याचे चॅनेलकडून वारंवार दाखवले जात होते. त्यावर या तरुणाने विश्वास ठेवला. त्या वादातून हा सोशल मिडियावर परमबिर सिंह यांना धमकावत होता.

हेही वाचाः- पुढील ३ महिने वृत्तवाहिन्यांच्या टीआरपीला स्थगिती, ‘बार्क’चा मोठा निर्णय

दरम्यान, या तरुणाच्या कुटुंबाची आर्थिक आणि सामाजिक परिस्थीती चांगली आहे. त्याच्या कुटुंबातील लोक विविध क्षेत्रांमध्ये चांगल्या पदांवर कार्यरत आहेत. ‘मुंबई मिरर’ने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या काही काळापासून मुंबई पोलीस आयुक्त आणि एका पोलिस अधिकाऱ्याच्या कुटुंबीयांना वेगवेगळ्या पद्धतीने धमकीचे मेसेज मिळत होते. अधिकारी या मेसेजकडे लक्ष देत नव्हते. परंतू, जवळच्या नातेवाईकाला आलेल्या मेसेजनंतर पोलिसांनी प्रकरण गांभीर्याने घेतले. या तरुणाने पोलीस आयुक्त आणि इतर अधिकाऱ्यांच्या जवळच्या नातेवाईकाला सोशल मिडायाच्या माध्यमातून धमकी दिली की, पोलीस आयुक्तांना समजावून सांगा की गप्प राहा. ते (पोलीस आयुक्त) गप्प होणार नसतील त्यांना गप्प करण्याचे माझ्याकडे इतरही काही मार्ग आहेत.

हेही वाचाः- पोलीस मारहाण प्रकरणी ठाकरे सरकारमधील मंत्र्याला ३ महिन्यांची शिक्षा

पोलिसांकडून या प्रकरणात रितसर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असतानाच या तरुणास ताब्यात घेण्यातआले. हा तरुण मुंबई येथील एका वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेतो. पोलिसांनी केलेल्या अधिक चौकशीत पुढे आले की, त्याची बहीण चार्टर्ड अकाऊंटंट आहे. त्याचे वडील केमिकल इंजिनीअर आहेत. त्यांचा स्वत:चा कारखाना आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार तरुणाच्या वडीलांनी पोलिसांसमोर मान्य केले की, त्यांच्या मुलाची चूक झाली आहे. चुकीच्या लोकांच्या संपर्कात आणि प्रभावाखाली आल्यामुळे त्याने हे कृत्य केल्याचे वडीलांनी सांगितले.

पुढील बातमी
इतर बातम्या