Advertisement

पोलीस मारहाण प्रकरणी ठाकरे सरकारमधील मंत्र्याला ३ महिन्यांची शिक्षा

यशोमती ठाकूर यांना पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी अमरावतील न्यायालयाने दोषी ठरवत ३ महिन्यांची शिक्षा आणि १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

पोलीस मारहाण प्रकरणी ठाकरे सरकारमधील मंत्र्याला ३ महिन्यांची शिक्षा
SHARES

ठाकरे सरकारमधील महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी अमरावतील न्यायालयाने दोषी ठरवत ३ महिन्यांची शिक्षा आणि १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. या शिक्षेनंतर भाजपने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. (amravati court sentenced 3 months of minister yashomati thakur in police personnel beaten up case)

हे प्रकरण ८ वर्षे जुनं आहे. यशोमती ठाकूर यांनी अमरावती येथील अंबादेवी मंदिराजवळ उल्हास रौराळे नावाच्या एका पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. यामध्ये त्यांचा वाहनचालक आणि दोन कार्यकर्त्यांचाही समावेश होता. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर हे प्रकरण जिल्हा न्यायालयात गेलं. या प्रकरणात आरोप सिद्ध झाल्याने यशोमती ठाकूर यांना ३ महिन्यांची शिक्षा आणि १५ हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ठाकूर यांच्यासोबत कारचालक आणि २ कार्यकर्त्यांनाही दोषी ठरवण्यात आलं आहे. या प्रकरणात फितूर होऊन साक्ष देणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्यालाही शिक्षा सुनावण्यात आली आहे.

हेही वाचा - जलयुक्त शिवार योजनेची SIT मार्फत खुली चौकशी होणार

यावर भाष्य करताना न्यायालयीन प्रक्रियेचा मी सदैव आदरच केला आहे. मी स्वतः वकील असल्याने या प्रकरणावर भाष्य करणार नाही. आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार असून सत्याचा विजय होईल, असं यशोमती ठाकूर यांनी सांगितलं.

या एका घटनेमुळे आता माझ्या मागे अख्खं भाजप लागणार. माझी भाजपसोबत वैचारिक लढाई आहे. त्यांच्या फॅसिस्ट विचारधारेविरूद्ध आमची लढाई चालतच राहणार. कितीही आमच्यात अडथळे आणले, कितीही आम्हाला संपवण्याचा प्रयत्न केला. तरीही ही लढाई आम्ही लढतच राहणार. भाजपने माझ्या राजीनाम्याची मागणी करण्यापेक्षा स्वत:च्या नेत्याने मागील ५ वर्षांत जे कारनामे केले आहेत, त्याबद्दल बोलावं. जलयुक्त शिवार मध्ये काय दिवे लावले आहेत आणि किती भ्रष्टाचार झालेला आहे, याचे प्रश्न त्यांनीच त्यांच्या नेत्याला विचारावेत, असंही यशोमती ठाकूर म्हणाल्या.

हेही वाचा - TRP Scam : रिपब्लिकचे सीएफओ एस सुंदरम यांची उद्या होणार चौकशी

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा