Advertisement

पुढील ३ महिने वृत्तवाहिन्यांच्या टीआरपीला स्थगिती, ‘बार्क’चा मोठा निर्णय

मुंबई पोलिसांनी वृत्तवाहिन्यांचा टीआरपी घोटाळा उघडकीस आल्यानंतर 'ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल' (BARC) ने पुढील १२ आठवडे वृत्त वाहिन्यांचं रेटिंग्स जारी न करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

पुढील ३ महिने वृत्तवाहिन्यांच्या टीआरपीला स्थगिती, ‘बार्क’चा मोठा निर्णय
SHARES

मुंबई पोलिसांनी वृत्तवाहिन्यांचा टीआरपी घोटाळा उघडकीस आल्यानंतर 'ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल' (BARC) ने पुढील १२ आठवडे वृत्त वाहिन्यांचं रेटिंग्स जारी न करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. 'नॅशनल ब्रॉडकास्टर्स असोसिएशन' (NBA) ने बार्कच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. (BARC pauses indian news channels tv ratings in fake TRP case)

बार्क हा उपक्रम प्रसारणकर्ते (आयबीएफ), जाहिरातदार (आयएसए) आणि जाहिरात तसेच प्रसारमाध्यमांशी संबंधित संस्थेच्या (एएएआय) प्रतिनिधींच्या माध्यमातून हाताळला जातो. बार्क इंडिया २०१० मध्ये सुरु करण्यात आली. या संस्थेचं मुख्य कार्यालय मुंबईमध्ये आहे. टीव्ही वाहिन्यांच्या कामकाजाचं मोजमाप करणारी ही जगातील सर्वात मोठी संस्था आहे. बार्ककडून प्रत्येक आठवड्याला चॅनलचे रेटिंग्स जाहीर केले जातात. त्याआधारे जाहिरातदार आणि वाहिन्यांमधील कामकामाजात सूसूत्रता ठेवण्यात येते.

हेही वाचा- TRP Scam: टीआरपी घोटाळ्यात पाचवी अटक, हंसाच्या माजी कर्मचाऱ्याला बेड्या

परंतु मुंबई पोलिसांनी एका तपासादरम्यान काही वाहिन्या अधिकाधिक जाहिराती मिळवण्यासाठी पैसे देऊन बनावट टीआरपी वाढवण्याचा प्रकार करत असल्याचा दावा मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होता. हा आर्थिक घोटाळा असून त्यात ‘रिपब्लिक’ या वृत्तवाहिनीसह ‘फक्त मराठी’, ‘बॉक्स सिनेमा’ आदी वाहिन्यांचा सहभाग पुढे आल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं होतं.

त्यानंतर बार्कने पुढील १२ आठवडे वृत्त वाहिन्यांचे रेटिंग्स जाहीर न करण्याची भूमिका घेतली. टीआरपी मूल्यमापनाची सध्याची पद्धत आणि यंत्रणेतील दोष दूर करण्यासाठी काय करता येईल याचा आढावा घेणार या दरम्यान घेणार असून हा १२ आठवड्यांचा अवधी आपल्या पूर्ण यंत्रणेचा आढावा घेण्यासाठी तसंच देशात काय पाहिलं जातं यासंंबंधी विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी वृत्तवाहिन्यांनी वापरावा, असं मत बार्कने व्यक्त केलं आहे.

बार्कच्या निर्णयाचं एनबीएने स्वागत केलं आहे. बार्कने योग्य दिशेने पाऊल टाकलं असल्याची प्रतिक्रिया एनबीएकडून देण्यात आली आहे. सोबतच, बार्कनं कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेण्यापूर्वी एनबीएशी सल्लामसलत करावी, असा सल्लाही एनबीएचे अध्यक्ष रजत शर्मा यांनी दिला आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा