TRP scam: टीआरपी घोटाळ्यात पाचवी अटक, हंसाच्या माजी कर्मचाऱ्याला बेड्या


TRP scam: टीआरपी घोटाळ्यात पाचवी अटक,  हंसाच्या माजी कर्मचाऱ्याला बेड्या
SHARES


फेक टीआरपीप्रकरणात गुन्हे शाखेच्या सीआयू पथकाने सोमवारी उत्तरप्रदेशच्या मिर्जापूरहून पाचवी अटक केली. विनय ञिपाटी (30) असे या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणात आतापर्यंत 36 जणांचे जबाब नोंदवण्यात आले असून उद्या रिपब्लिक चँनेलच्या अधिकाऱ्यांसह या संशयित चँनेलला जाहिराती पुरवणाऱ्या अँड एजन्सीच्या अधिकाऱ्यांना सीआयूने चौकशीला बोलावले आहे.


 मालाड परिसरात राहणारा विनय हा हंसाचा माजी कर्मचारी आहे. 2018 मध्ये त्याने कंपनीचा राजीनामा दिला होता. चार वर्ष विनय हंसासाठी काम करत होता.
माञ विनय हा विशालला पैसे देत होता. विनयला उद्या उत्तरप्रदेशच्या न्यायलयात हजर केले जाणार असून बुधवारी मुंबईत आणणार आहेत. दरम्यान आज या प्रकरणात हंसाचे सीईओ प्रवीण निझार यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यात आले. तसेच नितीन देवकर जे हंसा चे डेप्युटी मॅनेजर आहेत त्यांचेही स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यात आलं. त्यांच्याकडून काही कागदपत्रांची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय घनश्याम सिंग रिपब्लिकचे डिस्ट्रिब्युटर हेड आणि सीईओ विकास खानचंदानी त्यांना आज साडेपाच वाजता कागदपत्रासहित बोलावण्यात आले होते. राज्यात या प्रकरणाचा तपास करण्यासाठी 7 पथक विविध राज्यात कार्यरत आहेत.

रिपब्लिक टीव्हीचे सिएफओ शिवा सुंदरम उद्या मुंबईत येणार  असल्याचे पोलिसांना त्यांनी कळवले आहे.
सुंदरम यांचे 3 जवळचे नातेवाईक कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. ते दिल्लीत असल्यामुळे तपासाला येऊ शकले नव्हते. सुंदरम यांच्याकडून कोव्हीडचे कारण  पुढे करण्यात आले होते. त्याची पडताळणी पोलिस करणार आहेत. फक्त मराठी व बॉक्स सिनेमा या वाहिन्यांच्या चॅनेलच्या मालकांचे आणि चॅनेलचीी 4  बँक खाती गोठवण्यात आली आहेत. 102 सीआरपीसी  अंतर्गत ही चार खाती गोठवण्यात आली आहेत. संपूर्ण प्रकरणात फॉरेन्सिक ऑडिट करण्यासाठीच टेंडर्स आज जारी करण्यात आले. संशयित चॅनेलच्या प्रत्येक रुपयाच गुन्हे शाखेकडून स्कॅनिंग होणार आहे. रिपब्लिककडून सांगण्यात आलं की त्यांचं उत्पन्नाच साधन फक्त जाहीरात आहे. फक्त मराठी आणि बॉक्स च्या चॅनेलच्या खात्यात करोडो रुपये असल्याचं स्पष्ट झालं आहे. याप्रकरणी आतापर्यंत टीआरपी स्कॅम प्रकरणात 36 जणांचे जबाब नोंदवण्यात आलेत. या गैरव्यवहारात या  तीन चँनेलसह इतरही चँनेलची नावे पुढे आली असून त्या अनुशंगाने तपास सुरू असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. 
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा