अकरावी प्रवेश: 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' फेरीसाठी ७६ हजार जागा

अकरावी प्रवेशाची विशेष फेरी राबवल्यानंतरही हजारो विद्यार्थी प्रवेशापासून वंचित असल्याने या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' ही प्रवेशफेरी पार पडणार आहे. या फेरीसाठी कॉलेजांना रिक्त जागा जाहीर करण्याचे आदेश शिक्षण विभागातर्फे देण्यात आले होते. त्यानुसार अकरावीच्या प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या फेरीसाठी एकूण ७६ हजार २११ जागा उपलब्ध असून यातील १९ हजार १५२ जागा इनहाऊस, अल्पसंख्याक व व्यवस्थापन कोट्यातील आहेत.

गुणवत्तेनुसार ३ गट

अकरावीच्या प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य ही फेरी सुलभ व्हावी या दृष्टीनं विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेनुसार ३ गट करण्यात आले आहेत. या प्रत्येक गटाला दिलेल्या मुदतीत प्रवेशाचा पर्याय प्रथम निवडणाऱ्या विद्यार्थ्यांना कॉलेजातील रिक्त जागांनुसार प्रथम प्रवेश देण्यात येणार आहे. यानुसार नुकताचं उर्वरित जागांचा तपशील वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आला.

इथं लाॅगइन करा

यानुसार गट क्रमांक १ म्हणजेच ८० ते १०० टक्क्यांदरम्यान गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांनी २७ ऑगस्ट रोजी https://mumbai.11thadmission.net/ या वेबसाईटवर जाऊन लॉग इन करावं. त्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच प्रोफाईल उपलब्ध होईल. या प्रोफाईल अगदी शेवटी प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य (First come First serve) या पर्यायासमोरील पार्टिसिपेट (participate) या ऑप्शनवर क्लिक करावं. त्यानंतर शाखा व माध्यम निवड केल्यानंतर तुम्हाला रिक्त जागा असलेल्या कॉलेजांची यादी उपलब्ध होईल.

काॅलेजची निवड

ही यादी उपलब्ध झाल्यानंतर तुम्हाला हवं असलेलं कॉलेजची निवड करून अप्लाय नाऊ या ऑप्शनवर क्लिक करून प्रवेश निश्चित करायचा आहे. त्यानंतर या प्रवेशाची कम्प्युटराइज्ड पावती स्क्रिनवर दिसल्यानंतर आपला प्रवेश निश्चित झाल्याचं विद्यार्थ्यांनी समजावं आणि त्या पावतीची प्रिंट कॉलेजमध्ये सादर केल्यानंतर विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. तसचं उर्वरित २ गटांसाठीची प्रवेशप्रक्रिया दिलेल्या मुदतीत राबवण्यात येणार आहे.


हेही वाचा-

यंदापासून विद्यापीठाच्या कल्याण उपकेंद्रात एमटेक

मुंबई विद्यापीठाचं मोबाइल अॅप सुरू


पुढील बातमी
इतर बातम्या