Advertisement

तरीही ५० हजार विद्यार्थी प्रवेशापासून वंचित

अकरावीच्या विशेष फेरीत १६ हजार १८१ विद्यार्थ्यांनी प्रवेश नाकारल्यानं हे विद्यार्थीही आता 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या फेरीत प्रवेशासाठी सहभागी होणार आहेत. यामुळे यंदा प्रथमच 'प्रथम येणाऱ्या प्रथम प्रधान्य' फेरीतही चढाओढ पाहायला मिळणार आहे.

तरीही ५० हजार विद्यार्थी प्रवेशापासून वंचित
SHARES
Advertisement

अकरावी प्रवेशाच्या विशेष फेरीतील प्रवेशाची मुदत संपल्यानंतर सुमारे ५० हजार विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिल्याचं समोर येत आहे. अकरावीच्या विशेष फेरीत १६ हजार १८१ विद्यार्थ्यांनी प्रवेश नाकारल्यानं हे विद्यार्थीही आता 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या फेरीत प्रवेशासाठी सहभागी होणार आहेत. यामुळे यंदा प्रथमच 'प्रथम येणाऱ्या प्रथम प्रधान्य' फेरीतही चढाओढ पाहायला मिळणार आहे.

प्रवेशाविना राहिलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा म्हणून सर्व फेऱ्या पार पडल्यानंतर 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' ही फेरी राबवली जाणार आहे. मात्र यंदा या फेरीला नामांकीत कॉलेजांतील जागाही रिक्त राहिल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी या फेरीला पसंती दिल्याचं प्रवेशाच्या आकडेवारीवरून समोर येत आहे.


इतक्या विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित

मुंबई विभागातून विशेष फेरीसाठी ४७ हजार ५७६ विद्यार्थ्यांनी अर्ज केलं होतं. यातील ३८ हजार ५६७ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आलं होतं. मात्र यातील केवळ २२ हजार २९७ विद्यार्थ्यांनी कॉलेजांमध्ये जाऊन प्रवेश निश्चित केला आहे. दरम्यान १६ हजार १८१ विद्यार्थ्यांनी प्रवेशाकडे पाठ फिरवली असून ६२ विद्यार्थ्यांनी मिळालेले प्रवेश रद्द केले आहेत. तसंच २७ विद्यार्थ्यांचे प्रवेश काही विशिष्ट कारणामुळ कॉलेजकडून नाकारण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागातर्फे देण्यात आली. अन्य विभागांतही विशेष फेरी 

मुंबईबरोबरच पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर आणि औरंगाबाद या विभागांतही अकरावीचे ऑनलाइन प्रवेश सुरू असून ही विशेष फेरी या विभागातही घेण्यात आली होती.

या विशेष फेरीत राज्यभरात सर्व विभागातून ५८ हजार ६४३ विद्यार्थ्यांना प्रवेश दिले गेले होते. त्यातील केवळ ३० हजार ४४० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले असून २८ हजार ७५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेले नाहीत. त्यमुळे संपूर्ण महाराष्ट्रभर अकरावी प्रवेशाच्या विशेष फेरीतील प्रवेशाची मुदत संपल्यानंतर ५० हजारपेक्षा जास्त विद्यार्थी प्रवेशाविना आहेत.


हेही वाचा -

नीट परीक्षा वर्षातून एकदाच; केंद्र सरकारचा यू-टर्न

संबंधित विषय
Advertisement