MPSC पूर्व परीक्षा २६ एप्रिलला होणार

कोरोनामुळे एमपीएससीकडून ५ एप्रिलला घेण्यात येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. ही परीक्षा आता रविवारी २६ एप्रिलला होणार आहे. तसंच ३ मे रोजी होणारी दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आता १० मेला घेण्यात येणार आहे. 

कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने राज्य सरकारने प्रतिबंधात्मक उपाय सुरू केले आहेत. त्यात शाळा-महाविद्यालये, वसतिगृहे-अभ्यासिका बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे अनेक उमेदवार आपापल्या गावी परतले आहेत. राज्यात उद्भवलेली स्थिती विचारात घेऊन ५ एप्रिलची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी राज्यभरातील उमेदवारांकडून करण्यात येत होती.  

आयोगाने जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार, ५ एप्रिलला होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि ३ मे ला होणारी संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकण्यात आली आहे. आता राज्यसेवा पूर्व परीक्षा २६ एप्रिलला आणि संयुक्त पूर्व परीक्षा १० मे रोजी घेतली जाणार आहे. करोना विषाणू संसर्ग रोखण्याच्या उपाययोजना विचारात घेऊन परीक्षेच्या आयोजनासाठीचा फेरआढावा घेतला जाईल, असे प्रसिद्धीपत्रकात पत्रात नमूद केले आहे. 


हेही वाचा -

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वाहतुकीसाठी बंद

महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या ८९ वर, तर मुंबईत आणखी एकाचा मृत्यू

Coronavirus Updates:मुंबईतील पेट्रोल पंप केवळ 'इतके' तास सुरू राहणार


पुढील बातमी
इतर बातम्या