कोरोना संकटात झाली इतर पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखांची परीक्षा

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखा वगळता इतर पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखांची परीक्षा घेण्यात आली. विशेष म्हणजे सीसीटीव्हीच्या माध्यमातून प्रत्येक परीक्षा केंद्रावर विद्यापीठामार्फत नजर ठेवण्यात आली. कोरोना महामारीच्या काळात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत परीक्षा घेणारं महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ महाराष्ट्रातलं पहिलं विद्यापीठ ठरल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली.

पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखा वगळता इतर पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखांची (दंत,आयुर्वेदिक,युनानी, होमिओपॅथी,नर्सिंग,फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, ऑडिओलॉजी स्पीच थेरपी) यांची लेखी परीक्षा १७ ते २३ ऑगस्ट २०२० या काळात राज्यातील ११५ केंद्रांवर पार पडली. या परीक्षेत २४२१ विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज आले होते. आणि या परीक्षेला विद्यार्थ्यांची सरासरी ९० टक्के उपस्थिती होती. (maharashtra government held successfully other medical education exams in coronavirus outbreak says amit deshmukh)

अमित देशमुख यांनी याबाबत माहिती दिली की, विद्यार्थ्यांची परीक्षा कोविड-१९ परिस्थितीला अनुसरून सुरक्षित वातावरणात घेण्यात आली. या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा २४ ऑगस्ट ते २४ सप्टेंबर या कालावधीत घेण्यात येणार आहे.

हेही वाचा - NEET-JEE परीक्षा घेण्यासाठी दबाव, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा दावा

पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखांच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा २५ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२० या कालावधीत प्रात्यक्षिक परीक्षा २ सप्टेंबर ते १० सप्टेंबर २०२० या कालावधीत घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर डिप्लोमा व सुपर स्पेशालिटी वैद्यकीय विद्याशाखेचे २२०४ विद्यार्थी बसणार असून सदर परीक्षा ३० परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे.

सर्व वैद्यकीय आरोग्य विज्ञान विज्ञान शाखा यांच्या अंतिम वर्ष पदवीपूर्व व प्रथम वर्ष एमबीबीएस (जुना अभ्यासक्रम) विद्यार्थ्यांच्या लेखी परीक्षा ८ सप्टेंबर ते ३ ऑक्‍टोबर २०२० व प्रात्यक्षिक परीक्षा विद्या शाखानिहाय २० सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर २०२० या कालावधीत घेण्यात येणार आहेत. या परीक्षा २७४ परीक्षा केंद्रांवर होणार असून या परीक्षेसाठी ९६८८ विद्यार्थी बसणार आहेत. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ मार्फत सर्व वैद्यकीय परीक्षांची तयारी पूर्ण करण्यात आल्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितलं.

हेही वाचा - सगळ्या परीक्षा पुढं ढकला, आदित्य ठाकरेंनी लिहिलं मोदींना पत्र

पुढील बातमी
इतर बातम्या