MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात येणाऱ्या सर्वच परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. कोरोना महामारीमुळे अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. या मागणीनंतर सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी देखील हा विषय लावून धरला होता.

MPSC मार्फत येत्या २० सप्टेंबर रोजी घेण्यात येणारी परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान धनंजय मुंडे यांनी केली होती. कोरोनामुळे निर्माण झालेला धोका, मर्यादित दळणवळण, विद्यार्थ्यांचे या काळात अभ्यासात झालेले नुकसान या सर्वांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे.

धनजंय मुंडे यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत कोविड परिस्थितीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येत असलेल्या सर्वच परीक्षा पुढे ढकलण्यात येत असून, परिस्थितीचा व विद्यार्थ्यांचा विचार करून सुधारित वेळापत्रक पुढे जाहीर करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

हेही वाचा : NEET-JEE परीक्षा घेण्यासाठी दबाव, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा दावा

येत्या २० सप्टेंबर रोजी राज्यसेवेची पूर्वपरीक्षा (एमपीएससी) लेखी परीक्षा महाराष्ट्रामध्ये होणार होती. पण यासंदर्भात धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहलं होतं.

यात म्हटलं होतं की, सध्याच्या परिस्थितीतीमध्ये एकीकडे कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असताना एमपीएससी परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना समूह संसर्गाचा धोका निर्माण होऊ शकतो. तसंच एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पूर्वतयारी, शैक्षणिक साहित्य यांसह इतर बाबींचाही अडचण झालेली आहे. त्यामुळे ही परीक्षा देखील आणखी काही दिवस पुढे ढकलण्यात यावी.


हेही वाचा

कोरोना संकटात झाली इतर पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखांची परीक्षा

NEET-JEE Main परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसारच

पुढील बातमी
इतर बातम्या