पालक म्हणतात 'फी वाढ नकोच'!

शारदाश्रम शाळेने प्रवेश नाकारलेल्या विद्यार्थ्यांच्या मदतीला आता मनसे धावून आली आहे. त्या 40 विद्यार्थ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून फीसाठी प्रत्येकी 5000 रुपये मदत म्हणून देण्यात येईल. शारदाश्रम विद्यामंदिर शाळेने प्रवेश नाकारल्यानंतर पालकांनी राजकीय पक्षाकडे धाव घेतली. त्यानंतर मनसेचे यशवंत किल्लेदार आणि संदीप देशपांडे यांनी शाळेला भेट दिली. त्यावेळी प्रत्येक विद्यार्थ्याला 5000 रुपये फी स्वरुपात देण्यात येतील. तसेच शाळेने उर्वरीत फी दर आठवड्याने भरण्याची मुदत दिल्याची माहिती यशवंत किल्लेदार यांनी दिली. त्याचप्रमाणे 4 ते 5 विद्यार्थ्यांच्या आर्थिक परिस्थितीची चाचपणी करून त्यांची संपूर्ण फी माफ करण्यात येईल, अशी कबुली शाळा प्रशासनाने दिली आहे.

काय आहे प्रकरण?

शारदाश्रम विद्यामंदिरने फी न भरलेल्या 40 विद्यार्थ्यांना सोमवारी शाळेत प्रवेश नाकारला. शाळेने घेतलेल्या या निर्णयामुळे विद्यार्थी आणि पालकांना भर पावसात शाळेबाहेर उभे रहावे लागले होते. मोठा शिशू वर्गाची फी 25 हजार 200 इतकी होती. ती वाढवून 42 हजार रुपये करण्यात आली होती. अनेक पालकांना वाढीव रक्कम भरणे शक्य नसल्याने त्यांनी फी भरली नाही. त्यामुळे शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांना बाहेर काढले.

काय आहे शाळेची भूमिका?

आरटीईमुळे खुल्या प्रवेशाची संख्या कमी झाल्याने फी वाढ करण्याचा निर्णय घेतल्याचे शारदाश्रम विद्यामंदिर प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या आधी शाळेत 180 विद्यार्थी होते. पण आरटीईच्या कायद्यानुसार केवळ 120 मुलांनाच प्रवेश मिळू शकतो. त्यात 25 टक्के राखीव जागा असतात, त्यामुळे 90 मुलांनाच खुला प्रवेश मिळू शकतो. परंतु शाळेचे शिक्षक तेवढेच आहेत. कर्मचारी आणि खर्च हा तितकाच असल्यामुळे फी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मंगळवारी आम्ही मुलांना शाळेत घेऊन आलो आहोत. शाळेने मुलांना वर्गात घेतले आहे. मात्र शाळेत पोलिस बंदोबस्त आहे. शाळा पोलिसांची मदत घेऊन आम्हाला धमकवण्याचा प्रयत्न करत आहे. शाळेत पालकांना एकत्र येऊ दिले जात नाही. मनसे आमच्या मदतीला धाऊन आली आहे. पण आम्हाला राजकीय पक्षांची मदत नको. कारण ही केवळ या वर्षीची समस्या नाही, तर दरवर्षी या समस्येला समोरे जावे लागणार आहे. त्यामुळे फी वाढ होऊच नये, अशी आमची मागणी आहे.

- सुमित खेडेकर, पालक


हेही वाचा - 

फी वाढी विरोधात पालकांचे आझाद मैदानात दुसरे आंदोलन

फी वाढीबाबत पालकांच्या तक्रारीनंतर राज्य सरकारला आली जाग


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

पुढील बातमी
इतर बातम्या