Advertisement

फी वाढी विरोधात पालकांचे आझाद मैदानात दुसरे आंदोलन


फी वाढी विरोधात पालकांचे आझाद मैदानात दुसरे आंदोलन
SHARES

'फोरम फॉर फेअरनेस इन एज्युकेशन'च्या वतीने आझाद मैदानात रविवारी आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनात मुंबई आणि उपनगरातील साधारणत: 3 हजार 800 आंदोलनकर्ते पालक सहभागी झाले होते. शिक्षण संस्था आणि शाळांनी मनमानी पद्धतीने फी वाढ थांबवावी, अशी मागणी यावेळी पालकांनी केली.

अनेकदा निवेदन देऊनही खासगी शाळांनी फी वाढी केली आहे. फी वाढीविरोधात पालकांनी अनेकदा शिक्षण मंत्र्यांची भेटही घेतली, मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा पालकांनी फी वाढीविरोधात आझाद मैदानात आंदोलन करावे लागले. मात्र यंदाच्या आंदोलनाला शिवसेना, काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी हजेरी लावल्यावर या आंदोलनाला राजकीय वळण मिळाले.

आंदोलनाच्या ठिकाणी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी पालकांची भेट घेत आंदोलनाला पाठिंबा असल्याचे जाहीर केले. या आंदोलनाला 'स्कूल बस ओनर असोसिएशन'च्या कार्यकर्त्यांनीही पाठिंबा दिला.

फोरमचे अध्यक्ष जयंत जैन म्हणाले, आंदोलनानंतर आम्ही आमच्या मागण्यांच्या संदर्भातील निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. आमच्या मागण्यांची दखल मुख्यमंत्री घेतील, अशी अपेक्षा आहे.

Read this story in English
संबंधित विषय