मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेनं (IDOL) जानेवारी २०२० सत्रातील प्रवेशप्रक्रियेला (admission process) मुदतवाढ दिली आहे. प्रवेशासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना (Students) प्रवेश घेण्यासाठी आयडॉलनं प्रवेशाची मुदत १० फेब्रुवारीपर्यंत वाढविली आहे. पहिल्या फेरीत ४१० विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. त्याशिवाय, १० फेब्रुवारीपर्यंत दिलेल्या मुदतवाढीत बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे.
दूर व मुक्त शिक्षणासाठी विद्यापीठ अनुदान आयोगानं २०१७मध्ये नवीन नियमावली जाहीर केली. त्यानुसार, 'आयडॉल'नं २०१९-२० या जुलै सत्रासाठी व जानेवारी २०२० सत्राच्या प्रवेशाला मान्यता दिली आहे. मुंबई विद्यापीठानं जुलै सत्राचे प्रवेश ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण केले. त्यामध्ये ६७ हजार ४०० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला.
हेही वाचा - काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दबावाखाली शिवसेना, लवकरच राजकिय भूकंप होईल – रामदास आठवले
२०१८-१९ मध्ये दूरशिक्षण संस्थेमध्ये ६७ हजार १३८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. त्यानंतर, जुलै सत्रात मागील वर्षापेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. जानेवारी सत्रात प्रथम वर्ष बी.ए., बी.कॉम, एम.ए., एम.ए. (शिक्षणशास्त्र) व एम.कॉम या अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची पहिली फेरी २१ ते ३० जानेवारी काळात राबवण्यात आली.
हेही वाचा - 'हिरोईन' शब्दाचा अर्थ कर्तबगार महिला, बबनराव लोणीकरांची सारवासारव
या फेरीत १ हजार २०० विद्यार्थ्यांनी प्रवेश नोंदणी केली आहे. तर ४१० विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. यामध्ये बी.ए. ७१, बी.कॉम ७४, एम.ए. ११३, एम.ए. एज्युकेशन १० आणि एम.कॉम १४२च्या विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे.
प्रथम वर्ष एम.ए., एम.ए. (शिक्षणशास्त्र) व एम.कॉम या अभ्यासक्रमांत यापूर्वीच पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेले किंवा ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. हे प्रवेश पूर्णपणे ऑनलाइन असून, विद्यार्थ्यांना शुल्कही ऑनलाइन भरावे लागणार आहे.
हेही वाचा -
अखेर 'त्या' जलवाहिनीच्या दुरूस्तीचं काम पुर्ण
फडणवीसांनी कोट्यावधी रुपये जाहिरातीवर उधळले