160 वर्षांचं मुंबई विद्यापीठ!

मुंंबईतल्या अनेक ऐतिहासिक वारशांपैकी एक असलेल्या मुंबई विद्यापीठाला मंगळवारी 18 जुलै रोजी 160 वर्ष पूर्ण झाली. भारतातल्या सर्वात जुन्या विद्यापीठांच्या यादीमध्ये मुंबई विद्यापीठाचा तिसरा क्रमांक लागतो. 1857मध्ये मद्रास(आत्ताचे चेन्नई), कोलकाता आणि मुंबई या तीन विद्यापीठांची स्थापना झाली. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रत्नागिरी, रायगड, कोकण आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधले महाविद्यालय मुंबई विद्यापीठाशी संलग्न आहेत. आज घडीला लाखो विद्यार्थी मुंबई विद्यापीठात शिक्षण घेत आहेत.

160 वर्षांचा इतिहास...

ब्रिटिश अधिकारी डॉ. जॉन विल्सन यांनी 18 जुलै 1857 रोजी मुंबई विद्यापीठाची स्थापना केली होती. 1996पर्यंत म्हणजेच स्थापनेनंतर तब्बल 139 वर्ष हे विद्यापीठ 'बॉम्बे विद्यापीठ' म्हणूनच ओळखले जात होते. त्यानंतर मुंबई शहराचे 'बॉम्बे' हे नाव बदलल्यानंतर विद्यापीठाचेही नाव 'बॉम्बे'वरुन 'मुंबई' करण्यात आले.

विद्यापीठाचा मोठा परिसर

मुंबई विद्यापीठाची दोन संकुलं आहेत. सांताक्रुझ आणि फोर्ट या दोन ठिकाणी मुंबई विद्यापीठाची संकुलं आहेत. यात सांताक्रुझ परिसरामध्ये तब्बल 230 एकर जागेत मुंबई विद्यापीठ उभे राहिले आहे. तर फोर्ट परिसरातून प्रशासकीय कारभार पाहिला जातो. मुंबई विद्यापीठात ६० हून अधिक विभाग आहेत. ८०० हून अधिक महाविद्यालय मुंबई विद्यापीठाशी संलग्न आहेत.

मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट परिसरातल्या इमारतीचं बांधकाम हे गॉथिक शैलीत करण्यात आलं आहे. इमारतीच्या बाजूलाच 230 फूट उंचीचा 1870मध्ये बांधलेला राजाबाई टॉवर आहे.

वादग्रस्त कारभारामुळे चर्चा

गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई विद्यापीठ हे तिथल्या अनागोंदी कारभारामुळे चर्चेत आहे. कधी कुलगुरूंची मनमानी, कधी ऑनलाईन असेसमेंटचा घोळ तर कधी विद्यापीठ प्रशासनाने परस्परच ठेवी मोडल्याचं प्रकरण. अशा प्रकारामुळे या वर्षभरात विद्यापीठ अनेकदा वादात सापडलं आहे.

विद्यापीठातून उत्तीर्ण झालेल्या प्रसिद्ध व्यक्ती

मोहम्मद अली जीना, पाकिस्तानचे माजी गव्हर्नर जनरल - बॉम्बे हाय स्कूलचे माजी विद्यार्थी

माधुरी दीक्षित, अभिनेत्री - मायक्रो बायोलॉजी

चंदा कोचर, संचालिका, आयसीआयसीआय बँक - मॅनेजमेंट स्टडीज

डॉ. अनिल काकोडकर, भाभा अणुसंशेधन केंद्राचे अध्यक्ष - मॅकॅनिकल इंजिनिअर

गंगाधर गाडगीळ, मराठी साहित्यिक - अर्थशास्त्रामध्ये पदव्युत्तर पदवी


हेही वाचा

सिनेट निवडणुकीसाठी 70 हजार मतदारांची नोंदणी


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 

पुढील बातमी
इतर बातम्या