ऑफलाईन प्रवेश घेऊ नका

अकरावी प्रवेशाच्या3 गुणवत्ता यादीमध्ये नाव आल्यानंतरही प्रवेश न मिळाल्याने अनेक विद्यार्थी निराश झाले आहेत. त्यामुळे आता या विद्यार्थ्यांनी ऑफलाईन प्रवेशाचा मार्ग अवलंबला आहे. पण कोणत्याही विद्यार्थांनी ऑफलाईन प्रवेश घेऊ नये, असे आवाहन उपसंचालक कार्यालयातून करण्यात आले आहे.

अकरावीची प्रथम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली होती. तेव्हा हजारो विद्यार्थ्यांना प्रथम पसंतिक्रमाचे महाविद्यालय मिळूनही अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नव्हता. अशा विद्यार्थ्यांना चौथ्या गुणवत्ता यादीत प्रवेश मिळणार आहे.

6 ऑगस्टला अकरावी प्रवेशाची चौथी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. या यादीसाठी प्रवेशक्रम बदलण्यासाठी विद्यार्थ्यांना 3 आणि 4 ऑगस्टची मुदत देण्यात आली आहे. या यादीत नाव जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना 7 आणि 8 ऑगस्टला प्रवेश निश्चित करायचे आहेत. त्यामुळे कोणताही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही.

- बी.बी.चव्हाण, शिक्षण उपसंचालक


हेही वाचा -

अकरावी प्रवेशाची यादी जाहीर

मुंबई विद्यापीठाचा सर्व्हर डाऊन


 

पुढील बातमी
इतर बातम्या