Advertisement

अकरावी प्रवेशाची यादी जाहीर


अकरावी प्रवेशाची यादी जाहीर
SHARES

अकरावी प्रवेशाच्या वेळापत्रकात अखेर बदल करण्यात आले आहेत. अकरावी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 29 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यामुळे अकरावी प्रवेशही पुढे ढकलण्यात आला आहे. नव्या वेळापत्रकानुसार पहिली गुणवत्ता यादी 10 जुलैला जाहीर करण्यात येणार आहे.


...म्हणून अकरावी प्रवेश उशिराने

अकरावी ऑनलाइन प्रवेशादरम्यान अर्ज भरताना अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे एक दिवस ऑनलाईन प्रक्रिया बंद ठेऊन सर्व्हर वाढवण्यात आले आणि ऑनलाइन प्रवेश सुरळीत झाला. या कारणास्तव ऑनलाईन अर्जाची तारीख 29 जूनपर्यंत वाढवण्यात आली.


सुधारित वेळापत्रक


यादी
तारीख
पहिली गुणवत्ता यादी
10 जुलै 2017
दुसरी गुणवत्ता यादी
20 जुलै 2017
तिसरी गुणवत्ता यादी
29 जुलै 2017
 चौथी गुणवत्ता यादी
6 ऑगस्ट 2017


9 ऑगस्टपासून अकरावी वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. 29 जून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 2 लाख 35 हजार 166 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले.


हे देखील वाचा - 

अकरावीची प्रवेशप्रक्रिया शुक्रवारपासून

मागच्या वेळची कट ऑफ लिस्ट पहा आणि निवडा तुमचं कॉलेज...



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा