अकरावीची प्रवेशप्रक्रिया शुक्रवारपासून

 Mumbai
अकरावीची प्रवेशप्रक्रिया शुक्रवारपासून

शिक्षण उपसंचालक विभागाने अकरावी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यावर्षी 4 गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीनुसार पसंतीक्रम भरावा लागणार आहे.
16 ते 27 जून या कालावधीत ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. 30 जूनला सर्वसाधारण यादी जाहीर करण्यात येईल. 1 ते 3 जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना अर्जात दुरुस्ती करण्याची संधी आहे. 3 ऑगस्टपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे.
अकरावीचे अल्पसंख्याक कोट्यातील प्रवेश कॉलेजकडूनच भरण्याचा निर्णय शिक्षण उपसंचालकाने घेतला आहे. कॉलजनी हे प्रवेश भरून त्याची माहिती ऑनलाईन सादर करायची आहे.

अशी असेल प्रवेश प्रक्रिया -

  • 16 ते 27 जून या कालावधीत ऑनलाइन अर्ज भरणे
  • पहिली यादी 7 जूलैला लागेल
  • 8 ते 11 जूलै या कालावधीत फी भरून आपला प्रवेश निश्चित करणे
  • 17 जूलै दुसरी प्रवेश यादी जाहीर होणार
  • 25 जूलैला तिसरी यादी जाहीर होणार
  • 26 ला फी भरून प्रवेश निश्चित करणे
  • 1 ऑगस्टला चौथी प्रवेश यादी
Loading Comments