अकरावीची तिसरी यादीही वेळेआधीच जाहीर!

  Mumbai
  अकरावीची तिसरी यादीही वेळेआधीच जाहीर!
  मुंबई  -  

  अकरावी प्रवेशाची शनिवारी जाहीर होणारी यादी शिक्षण उपसंचालक विभागाने वेळेच्या आधीच म्हणजे शुक्रवारी जाहीर केली. तिसऱ्या यादीत मुबंईतील नामांकित कॉलेजचा कटऑफ वाढलेला दिसून आला.


  इतक्या विद्यार्थ्यांना मिळाला प्रवेश

  तिसऱ्या यादीत आर्टस् शाखेसाठी 14 हजार 42, कॉमर्स शाखेसाठी 56 हजार 234 तर विज्ञान शाखेसाठी 31,927 जागा शिल्लक होत्या. त्यापैकी एकूण 47 हजार 956 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. 9 हजार 554 विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतिक्रमाचे कॉलेज देण्यात आले आहे. तिसऱ्या यादीत अनेक नामांकित कॉलेजचा कट ऑफ वाढलेला दिसून आला.

  पहिली गुणवत्ता यादी 10 जुलैच्या संध्याकाळी 5 वाजता जाहीर होणार होती. पण वेबसाईटच्या गोंधळामुळे ती 11 जुलैला पहाटे जाहीर करण्यात आली होती. दुसरी यादी 20 जुलैला जाहीर होणार होती. मात्र बोर्डाने आदल्यादिवशी रात्री 1 वाजताच जाहीर केली. त्यामुळे तिसरी यादी नेमकी कधी लागणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष होते. पण तिसरी यादीही शनिवारीच्या ऐवजी एक दिवस आधीच म्हणजे शुक्रवारी लावून बोर्डाने विद्यार्थ्यांना सुखद धक्काच दिला आहे.  हेही वाचा -

  ...अन्यथा 11वीचा प्रवेश रद्द होईल!

  ११ वीचे १० हजार विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेबाहेर


  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.