11वी प्रवेशाची सोमवारी पहिली यादी

  Mumbai
  11वी प्रवेशाची सोमवारी पहिली यादी
  मुंबई  -  

  सोमवारी 10 जुलै रोजी अकरावी प्रवेशाची पहिली ऑनलाईन यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे लक्ष पहिल्या गुणवत्ता यादीकडे लागले आहे. यावर्षी 100 टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्यामुळे पहिली लिस्ट नवदी गाठणार यात शंका नाही.

  अकरावीच्या जाहीर झालेल्या सर्वसाधारण यादीत 100 टक्के गुण मिळवलेल्या 14 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तर 90 ते 95 टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 10,991 इतकी आहे. त्यामुळे मुंबईतील नामांकित कॉलेजचा कट ऑफ नवद्दी पार जाणार.

  यंदा अकरावीला 2 लाख 35 हजार 484 विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. पहिल्या यादीत नाव लागल्यास विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित करावा, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.
  यावर्षी दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालात कला आणि क्रीडा कोट्यातील गुणांमुळे टक्केवारी वाढली आहे. त्याचा थेट परिणाम 11 वीच्या प्रवेशवर दिसून येणार आहे. पुढच्या वर्षीपासून नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना तोंडी आणि विज्ञान प्रात्यक्षिकाचे 20 गुण मिळणार नाही.  हे देखील वाचा -

  कोट्यातले प्रवेश ऑनलाईन होणार नाहीत !
  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.